Social-Media 
पुणे

समाजमाध्यमांवर मराठी साहित्यिकांना फॉलो करण्याचा ट्रेंड कमी

सकाळवृत्तसेवा

मराठी भाषा दिनानिमित्त तरुणाईचा जाणून घेतला कल; मराठीतून शिक्षणाचा आग्रह
पुणे - समाजमांध्यमांच्या युगात मराठीतील साहित्यिकांना ‘फॉलो’ करण्याचा ट्रेंड मराठी भाषिक युवकांमध्ये कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, मराठीतून शिक्षण हवं असा आग्रह याच तरुणाईने धरल्याचेही यातून स्पष्ट होते. मराठी भाषा दिनामित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील ३३ युवकांशी संवाद साधल्यावर हा कल समोर आला आहे. मराठीतील लेखक किंवा कवी यांना ट्वीटर, फेसबूक, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांवर ‘फॉलो’ करता का, या प्रश्नाचे उत्तर फक्त ५५ टक्के युवकांनी हो असे दिले आहे. अगदी १९ वर्षे ते २९ वर्षे वयोगटातील युवक आणि युवतींना हा प्रश्न विचारण्यात आला होता. सोशल मिडीयावर मराठीत पोस्ट लिहीत असल्याचे ७५.७५ टक्के युवकांनी सांगितले. तर शंभर टक्के युवकांनी मराठीतील वृत्तपत्र वाचत असल्याचे सांगितले आहे. व्यक्त होण्याच्या भाषेबरोबरच माध्यमही बदलत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठी भाषा या माध्यमात प्रवाहीपणे स्वीकारली जात असल्याचे यातून दिसते. असे जरी असले तरी व्यक्त होण्यासाठी इमोजींचा वाढता वापर आणि इंग्रजीचे गारूड यामुळे मराठी कुठेतरी कमी वापरात असल्याचे दिसते. मात्र, मनातील भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी ‘मराठी’चा आवर्जून वापर करत असल्याचे तरुणाई म्हणते. गुगलचे नवीन की-बोर्ड मराठीत लिहिण्यासाठी अगदी सोपे असल्यानेही समाजमाध्यमांवर मराठीतील पोस्ट वाढल्या आहेत.

सध्या इंग्रजी ही गरज झाली आहे. इंटरव्हिव्यू असो किंवा परिक्षा यामध्ये प्रथम इंग्रजी भाषेलाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मराठीतून शिक्षण उपलब्ध असले तरी चालेल, पण वास्तवाचा विचार करता ते सक्तीचे किंवा खूप आग्रहाचे नसावे. परंतु प्राथमिक शिक्षण मराठीतूनच असावे
- रामदास बडे

मराठीतील साहित्यिकांना समाज माध्यमावर ही फॉलो करत आहे. मराठीतील साहित्य थेट आपुलकी आणि भावनांना जागृत करतात. तर नागराज मंजुळे, अजीम नवाज राही, वीरा राठोड, महेंद्र कदम आदींचा यात समावेश आहे. त्याचबरोबर फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या समाजमाध्यमांवर मराठीत पोस्ट देखिल लिहितो.
- अक्षय आखाडे

मराठी बाबत तरुणाईचे असलेले मत 
प्रश्‍न - ‘हो’ म्हणणारे (टक्के)

१. मराठीचे भविष्य उज्वल आहे का - ८७.८
२. अंक किंवा संख्या सांगताना मराठीचा वापर करता का - ९४
३. दहा मराठी लेखक व कवींची नावे माहीत आहेत का - ७९
४. मराठीतील साहित्य वाचता का? - ८७
५. मराठीतील निदान एक कविता पाठ आहे का? - ८५

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT