Tricks to get rid of leopard attacks in  Ranjani Ambegaon
Tricks to get rid of leopard attacks in Ranjani Ambegaon 
पुणे

बिबटयाला हुसकविण्यासाठी देशी जुगाड

नवनाथ भेके निरगुडसर

निरगुडसर : बिबटया म्हटले की, सर्वांचीच पळापळ होते परंतु आता बिबटयाला हुसकविण्यासाठी एक देशी जुगाड तयार करण्यात आले आहे. रांजणी(ता.आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विदयालयातील अमित भंडारी या विदयार्थ्यांने टाकाऊ वस्तुंचा वापर करुन बिबटयाला पळवुन लावण्यासाठी मोठा आवाज निघणारी तोफ तयार केली आहे. परिसरात बिबटयाचा वावर अधिक प्रमाणात असल्याने अशाप्रकारे बनविण्यात आलेली तोफ परिसरात कुतुहलाचा विषय बनली आहे.

Video : पहाटेचा 'लिंबूडाव' झाला कॅमेऱ्यात कैद, काय ते पाहा... 

पुणे जिल्हयातील आंबेगाव, शिरुर, जुन्नर तालुक्यात बिबटयाची मोठी दहशत आहे. ऊसाची शेती अधिक प्रमाणात असल्याने बिबटया राञी-दिवसाही नागरिकांना दिसतो तसेच नागरिक, पाळीव प्राण्यावर हल्ले होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बिबटयापासून संरक्षण तसेच बिबटयाला पळवून लावण्यासाठी नामी सक्कल लढवून मोठा आवाज करणारी तोफ तयार करण्यात आली आहे.

पुण्यात रिक्षांच्या डिक्कीचोराचा धुमाकुळ

रांजणी येथील नरसिंह विदयालयात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानप्रदर्शनात विदयालयातील नववीत शिक्षण घेणारा अमित भंडारी या विदयार्थ्यांने टाकाऊ वस्तू पासुन एक आवाज करणारी तोफ तयार केली आहे तसेच या तोफेतून पुढे काही वस्तु वेगाने मारता येते. यासाठी दोनशे रुपये खर्च आला आहे.

पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)

नरसिंह विदयालयात विदयार्थ्यांने यशस्वी प्रात्याक्षिक करुन दाखवले आहे. एक दीड फुटाचा पाईपचा तुकडा, शेगडी गॅस लायटर व इंधन म्हणून डास मारायचा स्प्रे व एका बाजुने पाईपाला असलेली कॅप याचा वापर करुन तोफ तयार केली आहे.यातून बाहेर पडणारा मोठा आवाज हा जवळपास सुतळी बाँम्ब पेक्षाही मोठा आहे. तसेच पाईपात जर चेंडु अथवा कागदी बोळा टाकला तर खुप दुरवर जाऊन पडतो. सध्या बिबटयाला पळवण्यासाठी नागरिक फटाके वाजवतात. यामुळे वायु व ध्वनी प्रदुषण होते परंतु, बिबटया काही जागा सोडत नाही परंतु, या तोफेच्या आवाजामुळे बिबटया धुम ठोकेल हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT