3arrested_54.jpg
3arrested_54.jpg 
पुणे

कोयत्याने वार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीमाळवाडी येथील सुभाष घाडगे व नंदकुमार घाडगे यांच्यावर दोन दिवसापुर्वी कोयत्याने वार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी (ता. 12) पहाटे अटक केली आहे. राजु रविंद्र पवार व संकेत सुनिल गायकवाड ही अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचे नाव असुन, उर्वरीत फरार तीनही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.


सुभाष घाडगे व नंदकुमार घाडगे या दोघांच्यावर वरील पाच आरोपींनी कोयत्याने वार केले होते. या प्रकरणात वरील आरोपीना पोलिस पाठीशी घालत असल्याच्या संशयावरुन, शुक्रवारी (ता. 10) रात्री अकरा वाजनेच्या सुमारास शंभरहुन अधिक लोकांच्या जमावाने पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर रस्ता रोको करण्याबरोबरच पोलिसांच्या वाहनावर दगडफेक, पोलिसांना शिवीगाळ व रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे या प्रकरणाकडे नागरीकांचे लक्ष लागुन राहिले आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार घाडगे यांच्यावर गुरुवारी (ता. 9) राजु पवार याने कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी राजु पवार यास शुक्रवारी अटक केली होती. मात्र न्यायालयाने या प्रकरणात पवार याला जामिनावर सोडले होते. जामिनावर सुटताच पवार याने संकेत सुनिल गायकवाड, ऋुषिकेश पवार, नान्या पारडे व शंकर धायगुडे या चार सहकाऱ्यांच्या मदतीने सुभाष घाडगे यांच्यावरही कोयत्याने शुक्रवारी वार केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, पाचही आरोपी फरार झाले होते. मात्र लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे व पोलिस हवालदार समिर चमणशेख या दोघांनी रविवारी पहाटे राजु पवार यास सातारा येथुन तर संकेत गायकवाड याला स्वारगेट येथुन अटक केली. वरील दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली. 


दरम्यान, याच प्रकरणात शुक्रवारी रात्री पुणे-सोलापुर महामार्गावर जमाव जमवुन पोलिसांच्या वाहनावर दगडफेक व शिवीगाळ केल्याप्रकरणी व पोलिसांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिस नाईक शंकर तानाजी साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुरेखा मकवान यांच्यासह जयसिंग घाडगे, नंदकुमार घाडगे, सुभाष घाडगे, गणेश घाडगे, सचिऩ घाडगे, रमेश घाडगे, जीवण घाडगे, सचिन दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, अजय मुळेकर, निलेश घाडगे, विलास घाडगे, अनुराग घाडगे, बंटी चव्हाण यांच्यासह चाळीसहुन अधिक अऩोळखी महिला व चाळीसहुन अधिक अनोळखी पुरुषांच्यावर गुन्हे दाखल केला आहे. मात्र वरीलपैकी एकाही आरोपींला रविवारी (ता. 12) रात्री पर्यंत अटक करण्यात आली नव्हती. 

राजु पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना दोन वर्षासाठी तडीपार करणार 
याबाबत अधिक माहिती देताना लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, ''राजु रविंद्र पवार व संकेत सुनिल गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे तर, उर्वरीत तीन जणांना पुढील काही तासात अटक करण्यात येणार आहे. या पाचही आरोपींच्यावर सुभाष घाडगे व नंदकुमार घाडगे यांच्यावर खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला असुन, वरील आरोपींच्यावर यापुर्वीही काही गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. या सर्व गुन्हाची माहिती एकत्रीत करुन, पाचही जणांना पुणे जिल्हातून किमान दोन वर्षासाठी तडीपार करण्यासाठीचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT