Crime_Burglary 
पुणे

काय म्हणावं या चोरांना; घरफाेडीच्या पैशातून विकत घेतलं घर, कार अन् दागिने

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घरफाेडीचा प्रयत्न करीत असताना अटक करण्यात आलेल्या दाेन आराेपींच्या चाैकशीत त्यांनी पाच वर्षापूर्वी केलेला ५० लाख रुपये चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. चोरीच्या पैशाचे काय केले? याबाबत विचारणा केली असता आराेपींना त्या पैशातून दाेन घरे, फर्निचर, कार, माेटारसायकल, दागिने असा ऐवज खरेदी केल्याची कबुली दिली आहे. 

साेमनाथ बंडू बनसाेडे (वय ४७, रा. वारजे माळवाडी) आणि सुधाकर मुरलीधर बनसाेडे (वय ३७, रा. मांजरी बुद्रुक) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. त्यांच्या विराेधात डेक्कन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले की, ३० जुलै राेजी सकाळी साडेसहा वाजता एक इसम हातात चाकू घेऊन ग्रीन साेसायटी, प्रभात राेड याठिकाणी पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पाईपवरून चढत आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या महिलेवर तो चाकूने हल्ला करून जबरी चाेरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.

त्यानुसार पाेलिसांनी साेमनाथ बनसाेडे यास ताब्यात घेतले. पाेलिस निरीक्षक (गुन्हे) राजू चव्हाण यांचे पथक त्याच्याकडे चाैकशी करत असताना त्याने, ताे ज्या घरात घुसला हाेता. त्याच घरात २०१५ मध्ये त्याने आणि त्याचा चुलतभाऊ सुधाकर बनसाेडे या दाेघांनी ५० लाख रुपये आणि साेन्याचे दागिने चाेरून नेल्याची कबुली दिली. याबाबत पाेलिसांनी २०१५ च्या गुन्ह्याची खातरजमा केली असता अज्ञात आराेपींनी चाेरीत चार लाख रुपये राेख आणि एक लाख रुपयांचे साेन्याचे दागिने असा ऐवज चाेरून नेल्याचे दिसून आले. 

पत्नीला धक्का बसू नये म्हणून कमी रक्कम चोरीला गेल्याची तक्रार : 
आराेपी सांगत असलेला चाेरीचा माल हा रेकाॅर्डेवरील तक्रारीपेक्षा अधिक असल्याने याबाबत दुसरा आराेपी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चाैकशी केली. त्यांनी चाेरीत ५० लाख रुपयांची रक्कम आणि साेन्याचे दागिने मिळाल्याचे सांगितले. याबाबत तक्रारदार यांचेकडे पाेलिसांनी चाैकशी केली असता त्यांनी सांगितले की, मी माेठी रक्कम चाेरीस गेल्याचे सांगितले असते, तर पत्नीला मानसिक धक्का बसला असता त्यामुळे चाेरीची रक्कम कमी सांगितल्याचे स्पष्ट केले. 

चोरीच्या पैशांचा असा वापर : 
सुधाकर बनसाेडे यास चाेरीच्या गुन्ह्यातील ५० लाखांपैकी २८ लाख रुपये मिळाले. त्याने त्या रकमेतून मांजरी बुद्रुक येथे एक गुंठा जागेत ८०० चौरस फूट बांधकाम असलेले घर २० लाख रुपयात विकत घेतले. साडेपाच लाख रुपये किंमतीची रेनाॅल्ट कंपनीची कार आणि ८१ हजारांची एक माेटारसायकल विकत घेतली. तर चाेरीत मिळालेल्या दागिन्यांपैकी काही दागिने मामासाहेब हजारे पतसंस्थेत तारण ठेऊन कर्ज घेतले आणि काही दागिने माेडल्याची कबुली दिली.  

साेमनाथ बनसाेडे यास २२ लाख रुपये मिळाले होते. त्याने त्यातून भूगाव येथे एक वन बीएचके फ्लॅट खरेदी करुन फर्निचर, ग्रील अशी कामे केली. तर साेन्याचे दागिने माेडल्याची कबुली दिली आहे. दाेन्ही आराेपींची घरे, कार, माेटारसायकल, तारण ठेवलेले आणि माेडलेले एकूण १२ लाख ९५ हजार रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. या सर्वांची किंमत आता ६२ लाख ९५ हजार रुपये आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT