Crime 
पुणे

उरुळी कांचन येथून २८ किलो गांज्यासह दोन जण अटकेत

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) - जिल्हा (ग्रामिण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने गांजाची वाहतूक करणा-या दोन सख्ख्या भावांना उरुळी कांचन (ता. हवेली) येथे जेरबंद करुन, त्यांच्याकडुन २८ किलो गांजा व एक चारचाकी वाहन असा सव्वा आठ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी शंकर डुकळे (वय ३१) व तानाजी शंकर डुकळे (वय- २९, रा. दोघेही कोलवडी, ता हवेली) या सख्ख्या भावांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. २७) दुपारी केली असुन, पोलिसांनी वरील दोघांच्याकडुन सव्वा चार लाख रुपये किंमतीचा २८ किलो गांजा व गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एक चारचाकी कार असा एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

उरुळी कांचन परीसरात एका पांढऱ्या रंगाच्या कारमधुन दोन जण गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे या्ंना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिवाजी ननवरे व त्यांचे सहकारी सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार राजेंद्र पुणेकर, उमाकांत कुंजीर, महेश गायकवाड, निलेश कदम, विजय कांचन, जनार्दन शेळके, राजू मोमिन, धिरज जाधव आदीनी उरुळी कांचन रेल्वे लाईन जवळील रस्त्यावर साफळा रचला होता.

वरील पथकास पांढऱ्या रंगाची कार उरुळी कांचनहुन कोरोगाव मुळकडे जात असल्याचे लक्षात येताच, वरील पथकाने कार ताब्यात घेतली. कारची झाडाझडती करताच, पोलिसांना गाडीच्या मागच्या डिकी मध्ये पांढऱ्या रंगाचे गांजा असलेले पोते मिळून आले. यावर पोलिसांनी गाडीतील तानाजी डुकळे व शिवाजी डुकळे यांना ताब्यात घेतले पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२व्या वर्षी हरवलेला मुलगा २५व्या वर्षी परतला; गावात गेला तर घर नव्हते, पण आई दिसली… नंतर जे घडलं ते शब्दांच्या पलीकडचं

Maharashtra Election Update : राज्यातील राजकारण ढवळून निघणार! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कधीही होणार जाहीर? महत्त्वाची अपडेट समोर...

Viral Video : सीमेवर ड्युटी करताना स्वत:चाच वाढदिवस विसरला फौजी, मुलीने व्हिडिओ कॉल केला अन्... व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखोंची मनं

PCMC Election : भाजपकडून दादा लक्ष्य! पिंपरीतील कारभारावरून बावनकुळे यांचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update : रविंद्र चव्हाणांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध, बाभळगाव बंदची हाक

SCROLL FOR NEXT