Two arrested by police in theft in pune  
पुणे

पुणे : ...आणि पेट्रोल पंपावर चोरी करण्याचा त्यांचा 'प्लॅन' फसला ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे : रविवारी दुपारी कोरेगाव पार्कमधील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडील रोकड पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा प्लॅन पुरेसा फसला. दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने कर्मचाऱ्याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने हिसकावून पलायन केले खरे, पण त्याचा दुचाकीवरील बेसावध साथीदार कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडला, त्यास पोलिसी खाक्‍या मिळताच रोकड पळविणाराही काही तासातच पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम

कोरेगाव पार्कमध्ये पेट्रोल पंप जंक्‍शन आहे. याच ठिकाणी रोशनी पेट्रोल सर्व्हिस स्टेशन नावाचा एक पेट्रोल पंप आहे.रविवारी दुपारी कोरेगाव पार्क परिसरात नेहमीच्या तुलनेत कमी वर्दळ होती. दुपारी पावणे चार वाजले. त्यावेळी दुचाकीवर आलेले दोघेजण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले. त्यावेळी दुचाकीस्वाराच्या मागे बसलेला व्यक्ती पंपावरील कर्मचाऱ्याशी गप्पा मारत त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. संबंधीत तरुण जरा जास्तच लगट करत असल्याचे पाहून कर्मचाऱ्याने सावधपणे प्रतिसाद दिला. परंतु तो तरुण कुठलीतरी ओळख सांगून कर्मचाऱ्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. कर्मचाऱ्याने त्यास दूर थांबण्याचा सल्लाही दिला. मात्र तो थेट कर्मचाऱ्याच्या पाया पडू लागला. तेवढ्यातच त्याने संधी साधून कर्मचाऱ्याच्या खिशातील रोकड घेऊन तेथून पळ काढला. 

दरम्यान, तेथेच दुचाकीवर उभा असणारा त्याचा साथीदार मात्र बेसावध होता. त्याने गाडी सुरू करुन पळ काढेपर्यंत कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर झडप घालून त्यास पकडले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ कोरेगाव पार्क पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी पकडलेल्या दुचाकीस्वाराला ताब्यात घेऊन चौकशी केली.त्यावेळी त्याने त्या दोघांचा पेट्रोल पंपाचे पैसे चोरण्याचा डाव असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक रुपेश चाळके यांनी तत्काळ आरोपीचा ठावठिकाणा घेऊन रात्री नऊ वाजता पैसे घेऊन पळालेल्या चोरट्यास लक्ष्मीनगर येथे सापळा रचून बेड्या ठोकल्या. माजिद अकबर शेख व वृषभ बाबा पिसे (दोघेही रा.येरवडा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT