Two died and Eight corona positive patients in Ambegaon taluka 
पुणे

आंबेगाव तालुक्यात 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; दोघांचा मृत्यू

डी.के वळसे पाटील

मंचर( पुणे ) : आंबेगाव तालुक्यात कोरोना साथीने थैमान घातले आहे. बुधवारी (ता.५) सकाळी आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 342 झाली आहे. एकूण मृत्यूची संख्या सात झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जवळपास तालुक्यातील ५० टक्के गावात कोरोनाने शिरकाव केलेला आहे. त्यामुळे प्रशासन व गावकर्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. दरम्यान राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने सहा ऑक्सिजनच्या रुग्णवाहिका खरेदी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधेचे बेड वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

अवसरी खुर्द, गंगापूर खुर्द, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, पिंपळगाव-खडकी, जारकरवाडी येथे प्रत्येकी एक व शिनोली येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. खडकी व शिनोली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 96 रुग्णांवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय, वडगाव काशिबेग येथील भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल व अवसरी खुर्द येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत 239 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.अशी माहिती आंबेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.   

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

''आंबेगाव तालुका पंचायत समिती, आरोग्य खाते रात्रंदिवस काम करत आहेत. ठोस उपाय योजना ही करत आहे. ग्रामपंचयतिची त्यांना चांगली साथ मिळत आहे, पण अनेक गावातील नागरिक सोशल डिस्टन्स, प्रमाणित मास्क अन्य नियमांची अंमलबजावणी करत नसल्याने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश येत असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यांनी दिली. अजूनही  ही साथ आटोक्यात येत नसल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT