crime Sakal Media
पुणे

आंबेगाव तालुक्यात निर्घृण खूनाच्या दोन घटना, संशयित आरोपींना अटक

डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : आंबेगाव तालुक्यात मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (ता. २६) धामणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते सचिन जाधव यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून व रांजणी येथील महिला द्रोपदाबाई हरीभाऊ गि-हे यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील तातडीने मंचर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २६) आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलिस व गुन्हा अन्वेषण शाखेने या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना काही तासातच अटक केली आहे. सचिन जाधव हत्येतील चार आरोपींना घोडेगाव न्यायालयाने ता. एक जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या गुन्ह्यात एका महिलेचाही सहभाग असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

आरोपी थिटे याने बेकारी व्यवसायातील हिशोब करू. असे सांगून सचिन जाधव यांना रोडेवाडी फाट्यावर बोलावून घेतले. तेथे थिटे व जाधव यांची भांडणे झाली. त्यावेळी दबा धरून बसलेले विजय अनिल सूर्यवंशी, निलेश मारुती माळी, निलेश दादुभाऊ बर्डे आरोपी आले. त्यांनी कुऱ्हाडीने जाधव यांच्यावर वार केले. त्यावेळी जाधव यांनीही आरोपींचा हल्ला परतवून लावण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. पण आरोपींची संख्या अधिक असल्याने जाधव यांचे प्रयत्न निकामी ठरले. त्यानंतर जाधव यांच्या गाडीसह मृतदेह पारनेर तालुक्यात नेऊन मृतदेह व गाडीची विल्हेवाट लावली होती. पोलिस चक्र वेगाने फिरली. प्रथम बाळशीराम थिटेला ताब्यात घेतले. पण तो मी नव्हेच अशी भूमिका सुरवातीला त्याने घेतली होती. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर थिटे याने खुनाची कबूली देऊन अन्य आरोपींची नावे सांगितली. पण या गुन्ह्यात अजूनही एका महिलेचा सहभाग असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला आहे. सचिन जाधव यांची हत्या करणारे आरोपी बाळशीराम थिटे, विजय अनिल सूर्यवंशी, निलेश मारुती माळी, निलेश दादुभाऊ बर्डे या आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे, साहय्यक पोलिस निरीक्षक लहु थाटे, पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलिस नाईक नवनाथ नाईकडे, प्रविण गोसावी, अदिनाथ लोखंडे, संजय नाडेकर, दिनेश माताडे आदी पोलिस पथकाने अटक केली.

दरम्यान थोरंदळे (ता. आंबेगाव) येथील द्रोपदाबाई हरीभाऊ गिर्हे (वय ३२) या विवाहित महिलेसोबत प्रियकराने शरीरसंबध केले. प्रियकरासोबत आलेल्या मित्राने शरीरसंबध ठेवण्याची मागणी केली असता, महिलेने नकार दिला. त्याचाच राग मनात धरुन प्रियकर आणि त्याच्या मित्राने संगनमताने द्रोपदाबाई यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. याप्रकरणी प्रियकर शिवनाथ गावबा मधे (वय ४२ रा. गोरेमळा मांजरवाडी, ता. जुन्नर) व साथीदार सुनिल बबन भुतांबरे (वय ३० रा. मांजरवाडी ता. जुन्नर) या दोन्ही आरोपींना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. याकामी नारायणगाव पोलिस व गुन्हे अन्वेषण शाखेची मदत मिळाली. घोडेगाव न्यायालयाने सोमवार (ता. ३१) पर्यत आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Politics : उद्धव ठाकरेंचा सर्वात विश्वासू खासदार देणार धक्का! ओमप्रकाश राजेनिंबाळकर ठाकरे गट सोडणार? धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप

IND vs AFG 2nd ODI: रोहित शर्माच्या खेळण्यावर अनिश्चितता? शुभमनसोबर ओपनर कोण? जाणून घ्या प्लेईंग इलेव्हन

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! शेवटची खोपोली लोकल दोन महिन्यांसाठी रद्द, आठवड्यातून तीन दिवस विशेष ब्लॉक

Latest Marathi News Live Update : पाणीकपातीचे संकट गडद; गंगापूर धरणात केवळ ३३ टक्के पाणीसाठा, आठवड्यातून एक दिवस कपातीची शक्यता

Sanjay Raut : ३ मिनिटांत ४ वेळा साईबाबांची शपथ, राऊतांनी उल्लेख केलेला खासदार कोण? बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT