Two lakh cheating through dating site of a minor from high profile familyq 
पुणे

धक्कादायक : बारावीच्या मुलाचं डेटिंग साईटवर अकाऊंट; दोन लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः डेटींग साईटद्वारे तरुणीशी ओळख वाढविणाऱ्या उच्चभ्रु कुटुंबातील अल्पवयीन मुलाला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घातला. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेऊन अनोळखी तरुणीविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

याप्रकरणी हिंगणे खुर्द येथील माणिकबागेमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय महिलेने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन बीबी नावाच्या तरुणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खतरनाक खिलाडी 2 पाहिला, कारचा झाला मोह अन् जिगरी मित्रालाच संपविले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यांना एक मुलगा असून तो बारावीमध्ये आहे. त्यांच्या मुलाने ऑनलाईन डेटींग वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्यानंतर बीबी नावाच्या तरुणीने मुलाशी संपर्क साधला आहे. 

पुणे : नाचताना लागला धक्का म्हणून विद्यार्थ्यास जबर मारहाण

मुलगा अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधीत तरुणीने त्यास पोलिसांची भिती दाखविण्यास सुरूवात केली. त्यानंतर कुटुंबीयांना व पोलिसांना याबाबत माहिती न देण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे मुलाने घाबरून आईच्या डेबीट-क्रेडीट कार्डचा वापर करुन दोन लाख रुपये तरुणीना ऑनलाईन पाठविले. तसेच पैसे पाठविल्याचे मेसेज आईला आल्यानंतर तो तत्काळ डिलीट करीत होता. त्यामुळे फिर्यादी यांना हा प्रकार कळला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, मागील महिन्यातही त्याने महिलेला पैसे पाठविले. त्यावेळी आलेला मेसेज फिर्यादी यांनी पाहिला. त्यांनी बँकेकडे चौकशी केली, त्यावेळी त्यांच्या खात्यातील दोन लाख रुपये घेतल्याचे समजले. मुलाला याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार, पालकांनी तत्काळ पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Narwekar statement : अलिबाग येथे शेतकऱ्यांमधील वादाच्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा खुलासा

Maha Shivratri 2026 Song: नमो नमो शंकरा! कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलं; तरीही पुन्हा ऐकावं वाटणारं भक्तिगीत

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्रीनिमित्त कपिलेश्वर महादेव मंदिरावर फुलांची सुंदर सजावट

Maratha History : कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी पाकिस्तानच्या कराचीत कशी? मराठ्यांचा हा धगधगता इतिहास तुम्हाला माहिती असायलाच हवा

Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

SCROLL FOR NEXT