Crime_Rape 
पुणे

मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला; मित्राच्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केला बलात्कार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मद्यपान करण्यासाठी एकत्र येत मित्राच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोघा गुन्हेगारांनी मैत्रीच्या नात्याला काळिमा फासत मित्राच्या मुलीवर एक महिना अत्याचार केले होते.

दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी. तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत संबंधित मुलीला नुकसानभरपाई मिळवू शकते, असे निकालात नमूद करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला. गणेश ऊर्फ सिद्धू विलास भालेराव (वय 27) आणि सुधीर छत्रभूज गायकवाड (वय 27, रा. मुळानगर, जुनी सांगवी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये हा प्रकार घडला होता. पीडित 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आजीने या प्रकरणी तक्रार दिली होती. सरकारी वकील सुनील मोरे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.

पीडित मुलीच्या आईचे निधन झाल्यामुळे ती वडिलांबरोबर राहत होती. माझ्या नातीकडे लक्ष द्या, असे फिर्यादी यांनी नातीच्या शेजारी राहत असलेल्या महिलेला सांगितले होते. घटनेनंतर या महिलेने फिर्यादीला फोन करून जुनी सांगवी येथे येण्यास सांगितले. तेव्हा त्यांना हा प्रकार समजला. वडिलांसोबत दारू पिण्यासाठी येत असलेल्या दोघांना महिनाभर आपल्यावर अत्याचार केल्याचे मुलीने फिर्यादी यांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E-Challan Fine : ई-चलनचा दंड थकवल्यास वाहतूक परवाना निलंबित होणार

रस्त्यावर साबण विकणारा रातोरात झाला सुपरस्टार; नियत फिरली अन् स्वतःच्याच अपंग लेकावर आणली भीक मागायची वेळ !

Blocked Nose & Headache: सततचे नाक चोंदणे आणि डोकेदुखीः साधी ऍलर्जी की नाकातील घातक गाठी? वेळीच व्हा सावध !

Kidney Transplant : हलाखीच्या परिस्थितीतही बाप ठरला ‘जीवनदाता’; वडिलांनी दिली मुलाला किडनी

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT