Two monkeys die in an accident in Pune 
पुणे

वन्य प्राण्यांसाठी पुणे ठरतंय धोक्याच; माणसाची चूक माकडांच्या जीवावर बेतली!

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. नुकताच काही दिवासंपुर्वी एक गवा पुण्यात आला आणि हकनाक जीव गमावून बसला. ही घटना ताजी  असताना, पुण्यात दोन माकड शिरले आणि त्यांनी आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  दोन गाड्यांनी धडक बसल्याने त्यांनी जीव गमावला. खराडी बायपास रस्त्यावर शनिवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली.

खराडी परिसरातील माजी महापौर चंद्रकला कोंद्रे पुलावर दोन माकडे जात होती. अचानक एका माकड रस्त्यावर आले आणि त्याला एका कारच जोरदार धडक बसली. तितक्यात दुसरे माकड त्याच दिशेने येत असताना त्यालाही एका गाडीने उडवले आणि दोघांनी रस्त्याच जीव सोडला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या तिसऱ्या माकडाने धूम ठोकली.ही माकडे कोठून आली याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. 

देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही...

दरम्यान, घडलेल्या घटनेची माहिती मिळातच वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनचे सदस्य आणि खराडी स्मशानभूमीतील सेवक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी मृत माकडांचे देह रस्त्यावरुन बाजुला घेतली आणि संबधित प्रकाराची माहिती वन विभागाला कळवली. वन विभागाच्या परवानगी मिळल्यानंतर खराडी स्मशानभूमीतील सेवक कैलास भगत यांनी स्वखर्चाने खराडी- शिवणे रस्त्याच्या बाजुला खड्डा खोदून अत्यसंस्कार केले आणि तिथेच एक रोप लावून वाढविण्याचा संकल्प भगत यांनी केला.

दरम्यान, घडलेल्या प्रकारावरुन वन्यप्राण्यांच्या जीवाची काहीच किंमत नसल्याचे दिसत आहे. माकडांना धडक देऊन वाहनचालक तेथून पसार झाले. या माकडांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांना शिक्षा मिळणार का? असा सवाल उपस्थित  केला जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Chhatrapati Sambhajinagar: वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर झुंबड; ‘नो स्टॉक’चे बोर्ड; शेतीकामे, विवाह सोहळ्यांसह वाहतुकीला मोठा फटका

Maharashtra Weather Update : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT