accident Sakal Media
पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावरिल अपघातात दोन कामगारांचा मृत्यू

दोन्ही वाहनांना धडक देणाऱ्या ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले.

अमर परदेशी, वरवंड

पाटस ः पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस (ता. दौंड) येथे तीन वाहनांच्या विचित्र अपघातात कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीतील दोन प्रवासी कामगांराचा मृत्यू झाला. तर दोन कामगार जखमी झाले. बुधवारी (ता. १९) सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. योगेश मुसमाडे (वय ४०) रा. मांजरी, पुणे, ओमप्रकाश यादव (वय ५५) रा. हडपसर पुणे असे मृत झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर हिमेश चव्हाण (वय ४५) रा. हडपसर, मनोहर बंडगर (वय ४२) रा. दौंड हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली. दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीतील एक बस ही कामगारांना घेवून महामार्गाने पुण्याकडे चालली होती. सायंकाळी सहा वाजता पाटस घाटात बसच्या पाठीमागून येणाऱ्या एका मालवाहतूक टेंम्पोने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी टेम्पो चालक व बस चालक यांच्यात काही कारणास्तव चालू प्रवासातच वाद झाला. वैतागलेल्या बस चालकाने काही अंतर पुढे जावून पाठीमागून येणाऱ्या टेम्पोला थांबविले. यावेळी पुन्हा दोन चालकांमध्ये बाचाबाची सुरु झाली. हा प्रकार सुरु असतानाच पाठीमागून येणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकने रस्त्यात उभ्या असणाऱ्या बस व टेम्पोला जोराची धडक दिली. या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात बसमधील योगेश मुसमाडे या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन कामगार जखमी झाले.

माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पाटस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलिस नाइक दशरथ कोळेकर, हनुमंत खडके, सोनबा देशमुख आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. मृत कामगारास तत्काळ शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. तर गंभीर जखमींना तत्काळ उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारदरम्यान रात्री उशिरा ओमप्रकाश यादव यांचा मृत्यू झाला. दोन कामगारांवर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, दोन्ही वाहनांना धडक देणाऱ्या ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT