Digital-Media 
पुणे

पुण्यातील दोन युवतींनी लॉकडाउनमध्ये आपली कला जोपासून उत्पन्नाचा स्रोतही मिळवला

अक्षता पवार

पुणे - लॉकडाउनमधील वेळेचा सदुपयोग काही युवकांनी तंत्रज्ञान आणि ऑनलाइन माध्यमातून स्वतःच्या कलागुणांना वाढविण्यासाठी केला. इतकंच नाही तर अनेकांना यातून उत्पन्नाचा स्रोत देखील निर्माण झाला आहे. सिंहगड रस्ता येथील २२ वर्षीय तन्वी गोडबोले आणि रेवती संत या दोन युवतींनी असाच आगळावेगळा प्रयोग करत कला जोपासली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘नृत्याची आवड पहिल्यापासूनच होती. मात्र, कॉलेज, अभ्यास यातून पुरेसा वेळ मिळत नव्हता. लॉकडाउनच्या कालावधीकडे संधी म्हणून पाहिले. वेळ असल्याने आणि आपल्या कलेत भर व्हावी म्हणून स्वतः डान्सचे व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली. आमच्यासारखे आणखीन काही नवोदित कलाकारांना आमच्या व्हिडिओ मधून शिकावे व कला जोपासावी या हेतूने युट्यूब चॅनेल तयार केला. त्यावर हे सर्व डान्स व्हिडिओ टाकले. याचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे नृत्य सादर करत त्यांचे व्हिडिओ देखील आम्हाला पाठवले. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम सुरू असून यात विविध तंत्रज्ञानाचा देखील वापर करत आहोत. त्यासाठी अमेय ब्रह्मे हा विशेष मदत करतो.’ तन्वीने सांगितले.

‘युट्यूब चॅनेल सुरू केल्यानंतर इतका चांगला प्रतिसाद मिळेल याची कल्पना नव्हती. आम्ही टाकलेल्या व्हिडिओमुळे डान्सची आवड असलेल्या अनेकांनी ऑनलाइन डान्स वर्कशॉप सुरू करण्याची मागणी केली. सध्या मोठ्या संख्येने विविध वयोगटातील कलाकार यात सहभाग घेत आहेत. तसेच यातून आम्हाला देखील उत्पन्नाचा चांगला पर्याय उपलब्ध झाला असल्याचे रेवतीने नमूद केले.

गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने ऑनलाइन डान्स शिकत आहे. डान्स स्पर्धेत याचा मला फायदा झाला आहे. डान्सची आवड तर नक्कीच आहे; परंतु एखाद्या स्पर्धेत भाग घेण्यासाठीचा आत्मविश्‍वास नव्हता. मात्र, आता तो वाढला आहे.
- रसिका धडफळे

वेळेनुसार कधीही मला प्रॅक्‍टीस करणे शक्‍य झाले आहे. त्याचबरोबर नवनवीन नृत्यशैली सोप्या पद्धतीने शिकता येत आहे. 
- स्मिता वैद्य

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT