पुणे - "कोरोना'चा हॉटस्पॉट म्हणून भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे आजपर्यंत पाहिले जात होते. परंतु गेल्या महिन्याभरात ही ओळख पुसण्यात कार्यालयाला यश आले. एकेकाळी क्रमांक एकवर असलेल्या या कार्यालयाने घरटी सर्व्हेक्षण.. सर्दी, ताप. खोकला असेल, तर तातडीने उपचार, अशा उपाययोजना राबविल्या. त्यामुळे ते आता दहाव्या क्रमांकावर घसरले आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ 121 आहे. आतापर्यंत तेथे 846 रुग्ण आढळले होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण नऊ मार्चला आढळला. त्यास चार दिवसांनी तीन महिने होत आहेत. या तीन महिन्यांत पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 265 हून अधिक झाली. क्षेत्रीय कार्यालयनिहाय रुग्णांची संख्या महापालिकेकडून दररोज प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार गुरुवारी (ता. 4) सर्वाधिक रुग्णांची संख्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असल्याचे दिसून आले. त्या खालोखाल येरवडा- कळस- धानोरी तर तिसऱ्या क्रमांकावर भवानी पेठ कार्यालयाअंतर्गत रुग्णांची संख्या आहे. तेथे रुग्णांची संख्या 865 असली, तर त्यामध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ 121 आहे. आजपर्यंत बाधितांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर हे कार्यालय असले, तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहिली, तर ते दहाव्या क्रमांकावर आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. उपचार घेणाऱ्यांची संख्याही तेथे मोठी आहे. बाधित रुग्णांची संख्या 1,560 असून उपचार घेणाऱ्यांची संख्या सुमारे 509 आहे. त्या खालोखाल येरवडा -कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आजपर्यंत बाधितांची संख्या 935 असून उपचार घेणाऱ्यांची संख्या 289 आहे.
पंधरा क्षेत्रीय कार्यालयांत बाधित रुग्णांची संख्या आणि कंसात उपचार घेणाऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय : 1 हजार 560 ( 509)
भवानीपेठ : 865 (121)
घोले रोड : 624 (183)
येरवडा- कळस-धानोरी : 935 (289)
कसबा विश्रामबागवाडा : 646 ( 151)
वानवडी-रामटेकडी 431 (184)
बिबवेवाडी - 504 (213)
नगर रस्ता- वडगावशेरी : 258 (180)
धनकवडी- सहकारनगर : 300 (76)
हडपसर- मुंढवा : 283 (137)
कोंढवा- येवलेवाडी : 112 (34)
औध - बाणेर : 48 (40)
कोथरूड- बावधन : 46 (23)
सिंहगड रस्ता : 280 (204)
वारजे- कर्वेनगर: 48 (13)
सहा हजारांवर रुग्णसंख्या
पुणे महापालिकेची पंधरा क्षेत्रीय कार्यालये आहेत. गुरुवारपर्यंत पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 6 हजार 93 वर पोचली आहे. त्यापैकी आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या रुग्णांची संख्या ही 4 हजार 907 आहे. तर सात क्षेत्रीय कार्यालयात अंतर्गत रुग्णांची संख्या ही 1 हजार 186 असल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.