Crime_Theft 
पुणे

कोरोनानं काय वेळ आणली; बेरोजगार झालेला तरुण बनला चोरटा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बारावी पूर्ण झालेला देवराम चिल्लावार हा रांजणगाव भागातील एका नामांकित कंपनीत नोकरी करीत. मात्र, लॉकडाउन काळात काम बंद झाल्यामुळे तो गेल्या दीड महिन्यापासून बेरोजगार होता. पैसे नसल्याने गुजराण कशी करायची, अशी चिंता त्याला सतावत होती. त्यामुळे त्याने चोरीचा मार्ग निवडला. त्याच्या गुन्ह्यांची खबर मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

22 वर्षीय देवराम हा रांजणगावमधील आशापुरा मार्केट परिसरात राहायला आहे. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे.
ओएलएक्‍सवर मोबाईल विक्रीची जाहिरात पाहून तो विक्रेत्यास भेटायला बोलावून घेई. त्यानंतर पैसे आणण्याचा बहाणा करीत मोबाईल घेऊन पळून जात असे. स्वारगेट पोलिसांनी तपास करीत त्याला अटक केली. त्याच्याकडून 16 मोबाईल, एक लॅपटॉप आणि एक दुचाकी असा सहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आला आहे.

स्वारगेट पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, कर्मचारी सज्जाद शेख, महेश जगताप, महेश काटे, सचिन दळवी, शिवाजी सरक, सोमनाथ कांबळे, सोनाली खुटवड यांच्या पथकाने तपास करीत देवराम याला ताब्यात घेतले. आरोपीवर लोणीकंद, चाकण, यवत, चंदननगर आणि खडकी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अशाप्रकारे कोणाचा मोबाईल चोरीस गेला असेल, तर त्याने पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन स्वारगेट पोलिसांनी केले आहे.

पैसे काढण्याच्या बहाण्याने ठोकत धूम :
देवराम याने ओएलएक्‍सवर मोबाईल विक्रीची जाहिरात पाहून एका विक्रेत्याशी संपर्क साधला. मोबाईल खरेदी करायचा आहे, अशी बतावणी करीत त्यांना स्वारगेट येथे बोलावून घेतले. त्यानंतर मोबाईल पाहायच्या उद्देशाने तो हातात घेत आता माझ्याजवळ कॅश नाहीत. एटीएममधून काढून देतो, असे सांगितले. दोघेही एटीएमजवळ गेल्यानंतर विक्रेता दुचाकीवरून खाली उतरल्यानंतर देवरामने मोबाईलसह तेथून धूम ठोकली होती. रविवारी (ता.6) हा प्रकार घडला होता. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर गुंडगिरीचा माज; किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार करण्याचे प्रकार वाढले

Mumbai Rent Rules: मुंबईत भाडे करार नियमात बदल, ऑनलाइन नोंदणी बंधनकारक; नियम मोडल्यास 'इतका' दंड

kolhapur ZP: कुस्त्यांच्या मैदानांवर भावी जिल्हा परिषद सदस्यांचा राजकीय रंग, कोल्हापूर जिल्ह्यात मिनी विधानसभेसाठी अनेकांनी ठोकळा अघोषीत शड्डू

Pune News: वधू एक, बायोडाटा अनेक! पुण्यात विवाह मंडळांकडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या समर्थनात आंदोलन

SCROLL FOR NEXT