पुणे

धक्कादायक! शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड; आरोपीच्या हल्ल्यात गमावले डोळे

नितीन बारवकर

शिरूर : प्रात:विधीसाठी घराबाहेर गेलेल्या महिलेची झाडीत लपून बसलेल्या अज्ञाताने छेडछाड केली. परंतू महिलेने प्रतिकार केला असता त्या अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला. त्याच्या हल्ल्यात महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. न्हावरे (ता. शिरूर) येथे काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

गंभीर जखमी अवस्थेत संबंधित महिलेला उपचारार्थ ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अज्ञात हल्लेखोराविरूद्ध शिरूर पोलिसांनी आज जीवघेणा हल्ल्याबरोबरच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावरे गाव परिसरात संबंधित ३७ वर्षीय महिला पतीसह पत्र्याच्या खोलीत राहावयास होती. काल रात्री नऊच्या सुमारास शौचास म्हणून ती घराच्या मागील बाजूस काही अंतरावर गेली असता, तेथे झुडपात एक तिशीतील तरूण दबा धरून बसला होता. त्याला पाहून महिलेने तुला आई-बहिण नाही का, असे म्हणताच संतप्त तरूणाने त्यांची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, त्यांनी प्रतिकार केला असता त्याने त्यांच्यावर हल्ला केला. केसाला धरून त्यांना खाली पाडून हातातील कठिण शस्त्राने तोंडावर फटके मारले. त्यात संबंधित महिलेचा एक डोळा बाहेर पडला; तर दुसरा निकामी झाला. दरम्यान, त्यांच्या आरडाओरड्याने शेजारचे लोक व महिलेचा पती मदतीला धावले असता, हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन झुडपातून पळून गेला. ग्रामस्थांनी रात्रभर त्याचा परिसरात शोध घेतला मात्र शोध लागू शकला नाही.

या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक बी. जे. पालवे, एस. एन. मोटे यांच्यासह आज घटनास्थळाची पाहणी केली. हा जीवघेणा हल्ला होण्यामागील कारणे पोलिस पथकाकडून तपासली जात असून, नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितले. या गंभीर प्रकरणाबाबत न्हावरे परिसरात दबक्या आवाजात उलट-सुलट चर्चा चालू असून, परिसरात व विशेषतः महिला-मुलींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

साधारणतः तिशीतील हल्लेखोराने तोंडाला लाल कापड गुंडाळले होते. काटकुळ्या देहाचा हा हल्लेखोर होता अशी प्राथमिक माहिती मिळाली असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत, असे पोलिस उपनिरीक्षक मोटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT