unjust to seal goods without inspection In marketyard Pune 
पुणे

तपासणी न करताच माल सील करणे अन्यायकारक

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : मार्केटयाडार्तील व्यापाऱ्यांकडील मालाची तपासणी न करताच सील करणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. एफडीए प्रशासनाकडून ऐन सणासुदीच्या काळात जाणूनबुजून माल सील केला जात असून याचा व्यापारावर परिणाम होत आहे. मालाचे सँपल घेऊन त्यात भेसळ आढळली तर कारवाई करावी परंतु त्याधीच माल सील करून तो विकण्यास बंदी घातली जात असल्याचा आरोप दि पुना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, नगरसेवक प्रविण चोरबेले, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, तेलाचे व्यापारी कन्हैय्यालाल गुजराथी, रायकुमार नहार आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

२२ ऑक्टोंबर रोजी एफडीए प्रशासनाकडून मार्केटयार्डात व्यापाऱ्यांवर कारवाई करून जवळपास ३६ लाख रुपयांचा माल सील केला आहे. एफएसएसएआय कायद्यातील काही तरतूदी अव्यवहार्य असून या तरतूदींचे पालन करणे बंधनकारक आहे. या तरतूदींचा आधार घेवून मालाचे नमूने घेवून माल सील केला जात आहे. वास्तविक व्यवसायिक कारवाई झालेल्या मालाचा उत्पादक नसून फक्त विक्रेते आहेत.

मालाची तपासणी करण्यासाठी आमची हरकत नाही. मात्र सील केल्यामुळे मालाची रक्कम तसेच जागा गुंतून पडते. त्यामुळे व्यावसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.आम्ही काय काळजी घेतली म्हणजे माल सील होणार नाही याचा खुलासा केल्यास व्यवसाय करणे शक्य होईल. अन्यथा सणासुदीच्या दिवसात मागविलेल्या मालावर कारवाई झाल्यास पुढील माल मागविणे शक्य होणार नाही़ त्यामुळे मालाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे़. कायदा राबविताना फक्त तरतूदींचा विचार न करता व्यवहार्य पध्दतीने ग्राहकांना चांगला माल मिळावा याचा विचार केला जावा अशी मागणीही ओस्तवाल यांनी केली.

तब्बल पावणे अकरा लाखाच्या मेफेड्राॅनसह 16 लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघाना अटक

नामांकित कंपन्यांकडून ज्या स्थितीत माल प्राप्त झाला आहे. त्या स्थितीत तो विक्री केला जातो. सर्वच पॅकबंद माल व्यावसायिकाने खाजगी लॅबमध्ये तपासणी करुन शक्य नाही. तसेच जे व्यावसायिक सुट्टया मालाची खरेदी करुन रिपॅकिंग करतात असे व्यावसायिक संबंधित मालाचा तपासणी अहवाल मालासोबत कंपन्यांकडून मागवत असतात.
-  कन्हैय्यालाल गुजराथी, तेलाचे व्यापारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: बाळापूर नगरपरिषद निवडणूक निकाल, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी यश

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT