Pune Weekend Lockdown Sakal
पुणे

पुणे व पिंपरी-चिंचवडला काय सुरू अन् काय बंद?

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याने मंगळवारपासून (ता. १) निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. नेमके काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? याबाबत सर्वांच्या मनात प्रश्‍न आहेत. ती पुढीलप्रमाणे...

प्रश्‍न : आदेशाची अंमलबजावणी कधीपासून होणार?
उत्तर : मंगळवारपासून

प्रश्‍न : किती दिवसांसाठी आदेश लागू राहणार?
उत्तर ः मंगळवारपासून दहा दिवसांसाठी

प्रश्‍न : या काळात काय सुरू राहणार?
उत्तर ः अत्यावश्‍यक सेवेची, जीवनावश्‍यक वस्तूंसह सर्व दुकाने

प्रश्‍न : अत्यावश्‍यक आणि जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकाने किती दिवस सुरू राहणार?
उत्तर : आठवड्याच्या सातही दिवस

प्रश्‍न : इतर दुकाने किती दिवस सुरू राहणार?
उत्तर : सोमवार ते शुक्रवार

प्रश्‍न : त्यांची वेळ काय असणार?
उत्तर : सकाळी ७ ते दुपारी २

प्रश्‍न : वाहतूक सुरू राहणार का?
उत्तर : एसटी, बस, रेल्वे, विमानसेवा सुरू राहणार

प्रश्‍न : सर्वसामान्य नागरीकांना प्रवास करता येणार का?
उत्तर : अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार

प्रश्‍न : पीएमपीची सेवा सुरू राहणार का?
उत्तर : फक्त अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी

प्रश्‍न : रिक्षा सुरू राहणार का?
उत्तर : होय

प्रश्‍न : केशकर्तनालय, ब्युटीपार्लर सुरू राहणार का?
उत्तर : प्रशासन म्हणते नाही, महापौर म्हणतात होय (संदिग्धता)

प्रश्‍न : हॉटेल, बार, रेस्टॉरंन्ट सुरू होणार का?
उत्तर : हो. परंतु केवळ पार्सल सेवा देता येणार (रात्री ११ पर्यंत)

प्रश्‍न : नागरीकांना पार्सल घेण्यासाठी जाता येणार का?
उत्तर : होय

प्रश्‍न : खासगी वाहतुकीला परवानगी राहणार का?
उत्तर ः होय. ५० टक्के क्षमतेनेच वापरता येणार

प्रश्‍न ः नागरीकांना लसीकरणासाठी जाता येणार का?
उत्तर : होय

प्रश्‍न : बाहेर गावावरून येणाऱ्या नागरीकांना घरी जाण्यासाठी काय सोय असणार?
उत्तर : बस, रिक्षा, खासगी प्रवासी वाहने

प्रश्‍न : पार्सल कसे मागविता येणार?
उत्तर : स्विगी, झोमॅटोसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून

प्रश्‍न : आंतरजिल्हा वाहतूक करता येणार का?
उत्तर : फक्त अत्यावश्‍यक सेवेसाठी करता येणार

प्रश्‍न : बांधकामे सुरू राहणार का?
उत्तर : कामगाराच्या निवासाची सोय असलेले प्रकल्प सुरू राहणार

प्रश्‍न : मॉल, चित्रपटगृहे, उद्याने खुली राहणार का?
उत्तर : नाही

प्रश्‍न ः घरेलु, सफाई अन्य कर्मचाऱ्यांना परवानगी राहणार का?
उत्तर : होय

प्रश्‍न : पथारी, हातगाडी व्यावसायिकांना परवानगी आहे का?
उत्तर : नाही. केवळ खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू राहणार, तेही पार्सल देता येणार.

प्रश्‍न : बँका सुरू राहणार का?
उत्तर : होय, आठवड्याच्या सर्व दिवस

प्रश्‍न : शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे सुरू राहणार का?
उत्तर : नाही.

प्रश्‍न: मद्य विक्रीची दुकाने सुरू राहणार का?
उत्तर : होय, आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २.

प्रश्‍न : बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट यांचे कार्यालय सुरू राहणार का?
उत्तर : होय. सकाळी ७ ते सायंकाळी ६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

Insurance Fraud: ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर विमा घोटाळ्याची छाया? बनावट अपघात प्रकरणातून वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेटचा पर्दाफाश

Ambedkar Cultural Hall: आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्ताराला स्थायी समितीची मंजुरी; २५ कोटींच्या निधीसाठी राज्य सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT