gulunche 
पुणे

हात जोडून प्रशासन सांगतय, ताई- माई मास्क वापरा... 

श्रद्धा जोशी

गुळुंचे (पुणे) : ताई- माई मास्क वापरा...मास्क न लावता गर्दीच्या ठिकाणी फिरू नका... योग्य शारीरिक अंतर ठेवा आणि खरेदी करताना गर्दी करू नका...असे आवाहन पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बाजारात मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांना अक्षरशः हात जोडून करण्यात आले.  

अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला आणि आठवडे बाजारासह इतर आस्थापना सुरू ठेवण्यास नियमावली घालून देत शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या नीरा येथे मोठी बाजारपेठ आहे. येथे बाजारात कायम वर्दळ असते. मात्र, काही नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. तसेच, शारीरिक अंतरही पाळत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभाग, स्थानिक ग्रामपंचायत, पोलिस, आशा सेविका  जनजागृती करत असून, कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच कोरोना अद्यापही गावात आलेला नाही.

मात्र, तरीही मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांना ग्रामसेवक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस, पोलिस मित्र व आरोग्य विभागाचे कर्मचारी व स्थानिक पत्रकार व ज्युबिलंट कंपनीच्या काही पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करत अक्षरशः हात जोडून, ताई- माई मास्क वापरा...मास्क न लावता गर्दीच्या ठिकाणी फिरू नका...योग्य शारीरिक अंतर ठेवा आणि खरेदी करताना गर्दी करू नका...असे आवाहन केले. तसेच,  मास्क नसलेल्या बाजारकरूंना प्रशासनाने मोफत मास्कचे वाटप केले.

मराठमोळ्या रीवाचा जागतिक गौरव
 
आता दंड करणार 
गांधीगिरी करत प्रशासनाने मास्क वापरण्याचे आवाहन केले असले, तरी या पुढे विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींना दंड आकाराला जाणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT