पुणे

‘लस मिळाली, चिंता मिटली’ असेच काहीसे समाधान या मुलांच्या चेहऱ्यावर

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : घरात आई, बाबांसह सर्वांनी लस घेतली, ते सुरक्षीत झाले, पण आम्ही शाळेत जातो, ट्यूशनला जातो पण आमचे लसीकरण (Vaccination) झाले नसल्याने १८ पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलामुलींमध्ये कोरोनाची (Coronavirus) भीती होतीच. आज पहिल्याच दिवशी शहरातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी मुलांची पावले वळाली. १०-१५ मिनिटात लस घेऊन बाहेर आल्यावर ‘लस मिळाली, चिंता मिटली’ असेच काहीसे समाधान या मुलांच्या चेहऱ्यावर होते.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार आजपासून (ता.३) पुण्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. पुणे शहरात सुरवातीला ५ केंद्र निश्‍चीत केले होते, पण ही संख्या अपुरी असल्याने गर्दी होण्याची शक्यता असल्याने आता ही संख्या ४० करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सीन लस देण्यास सुरवात झाली. शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदींच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ झाला.

शासनाने थेट शाळा सुरू केल्याने मुलांना शाळेत जावे लागत आहे, पण लसीकरण झालेले नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेच. त्यातच आत रुग्णसंख्या वाढायला सुरवात झाल्याने धाकधूक वाढली आहे. १जानेवारीपासून कोवीन ॲवपर आॅनलाइन नोंदणी सुरू झाली, तर आज सकाळी आठ वाजता लसीकरण केंद्रावरील स्लॉट निवडून लसीकरणासाठी नंबर लावला. तसेच ज्यांनी आॅनलाइन स्लॉट बुक केला नाही त्यांनी थेट लसीकरण केंद्रावर येऊन लस घेतली

सकाळी लसीकरण मोहीम सुरू होत असताना महापालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षकांकडून मुलांना व्यवस्थित माहिती दिली जात होती. घरातील मुले लस घेणार असल्याने पालक देखील त्यांना मानसिक आधार देण्यासाठी लसीकरण केंद्रांवर आली होती. केंद्रावर फारशी गर्दी नसल्याने व योग्य नियोजन केले गेले असल्याने १० ते १५ मिनिटात लस घेऊन मुले बाहेर येत होती. दुपारपर्यंत बहुतांश केंद्रावर १०० पेक्षा जास्त जणांचे लसीकरण झाले होते.

गोळी घ्या आराम करा

१८च्या पुढील वयोगटाचे लसीकरण केल्याने महापालिकेच्या केंद्रावरील कर्मचाऱ्यांना काय केले पाहिजे याचा अनुभव आल्याने आज कोठेही गोंधळ झाला नाही. मुलांना व्यवस्थित सहकार्य केले जात होते. लस घेतल्यानंतर त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी गोळी घेऊन आराम करा असा सल्ला दिला.

‘‘गेल्या दीड वर्षापासून कोरोना आहे, त्यामुळे शाळेत जाताना किंवा इतर ठिकाणी काळजी घ्यावी लागते. घरात आईबाबा सर्वाचे लसीकरण झाले आहे, आता मी देखील लस घेतली, मला त्यामुळे आता सुरक्षीत वाटत आहे.’’

-इशान नेर्लेकर, इयत्ता ९वी, ज्ञानप्रबोधिनी

"खर मोठ्या लोकांसोबत आमचेही लसीकरण यापूर्वीच सुरू करायला पाहिजे होते. आज पहिल्याच दिवशी लस घेतली, सध्या तरी काही त्रास नाही. चांगले वाटत आहे.’’

- व्यंकटेश मिरासदार, इयत्ता १०वी, एक्स्टर्नल

‘‘माझी आता १२वीची परीक्षा सुरू होणार आहे, त्यापूर्वीच लस घेतल्याने सुरळीतपणे परीक्षेला जाता येईल. पहिल्याच दिवशी लस मिळाली याचा आनंद आहे.’’

- रंजना भट, इयत्ता १२वी, झील महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT