vaccination sakal
पुणे

बारामतीत सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार सुरु

केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार बारामती शहर व तालुक्यातील 15 ते 18 वयोगटातील युवक युवतींसाठी कोवॅक्सिन या लसीचे लसीकरण सोमवारपासून (ता. 3) सुरु केले जाणार आहे.

मिलिंद संगई,

केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार बारामती शहर व तालुक्यातील 15 ते 18 वयोगटातील युवक युवतींसाठी कोवॅक्सिन या लसीचे लसीकरण सोमवारपासून (ता. 3) सुरु केले जाणार आहे.

बारामती - केंद्र शासनाच्या (Central Government) नवीन निर्देशानुसार बारामती शहर (Baramati City) व तालुक्यातील 15 ते 18 वयोगटातील युवक युवतींसाठी कोवॅक्सिन (Covaxin) या लसीचे लसीकरण (Vaccination) सोमवारपासून (ता. 3) सुरु केले जाणार आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी या बाबत माहिती दिली.

येत्या 7 जानेवारीपर्यंत बारामती शहर व तालुक्यातील या वयोगटातील जवळपास 22 हजार विद्यार्थ्यांना लसीकरणाचे उद्दीष्ट आरोग्य विभागाने निश्चित केले असून शाळा महाविद्यालयांच्या मदतीने ते पूर्ण केले जाणार आहे.

बारामती शहरातील शाळांमधून सोमवारपासून विद्यार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे. शाळांच्या माध्यमातून संमतीपत्रक घेऊनच विद्यार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे. दरम्यान बारामती एमआयडीसीतील महिला ग्रामीण रुग्णालयात दिवसभर या वयोगटातील मुला मुलींना लसीकरण केले जाणार आहे.

अगोदर नोंदणी केलेली नसली तरीही महिला ग्रामीण रुग्णालयात लसीकरण होणार आहे. विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे. शाळांमधूनही लसीकरणाची मोहिम राबवली जाणार आहे, शिवाय शहर व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शहर व तालुक्यात शाळा महाविद्यालयात जाऊन व प्राथमिक आरोग्य केंद्र अशा दोन्हीही ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

पालकांनी या वयोगटातील आपल्या मुलांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोविडपासून मुलांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने लसीकरण महत्वाचे आहे, त्या मुळे पालकांनी लवकरात लवकर हे लसीकरण करुन घ्यावे असे सुचविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: काव्या मारनची परफेक्ट चॉईस! 30 लाखाच्या गोलंदाजाने भल्याभल्यांना नाचवले; IPL 2026 नक्कीच गाजवणार

फॉरेनर बायकोचा हट्ट पडलेला बॉलिवूड अभिनेत्याला महागात; परदेशी स्त्रीसोबतच्या लिव्ह इनने झाला पश्चाताप

Latest Maharashtra News Updates Live: राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, शिवसेनेच्या प्रकाश महाजन यांची टीका

Dharashiv News : इमारत तयार, पण सुविधा अद्याप बंद; येरमाळ्यात शासकीय विश्रामगृह ३ वर्षांपासून लोकार्पणाविना!

Jalgaon Municipal Election : जळगावचा 'पहिला नागरिक' कोण? महापौर आरक्षणाची टांगती तलवार, उमेदवारांच्या काळजाची धडधड वाढली

SCROLL FOR NEXT