vaccination at wagholi center stops due to shortage of stocks 
पुणे

पुणे : वाघोलीत कोरोना लसीकरण थांबलं!

सकाळवृत्तसेवा

वाघोली: वाघोली येथील बी. जे. एस. लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपला आहे. यामुळे आज नागरिकांना लसीकरणा विना परतावे लागले. येथील केंद्रावर शनिवार पर्यंत 3489 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यातील 690 नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. वाघोलीसह अन्य गावातील नागरिकही लसीकरणासाठी वाघोली केंद्रावर येतात. वाघोलीत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 3247 झाला आहे. त्यापैकी 3069 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या 147 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे.
 

1 मार्च पासून दररोज कोरोना रुग्णात दोन आकडी संख्येने वाढ होत आहे. बरे होणाऱ्यांची टक्केवारी 95 टक्के आहे. वाढत्या कोरोनामुळे केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. वाघोली प्राथमिक केंद्रा अंतर्गत येणाऱ्या पाच गावात एकूण 17850 लाभार्थी आहेत. त्यातील 10853 लाभार्थी हे जेष्ठ नागरिक आहेत. तर अन्य जणांना इतर आजार आहे.


''साठवणूक केंद्रातच लस शिल्लक नसल्याने ती उपलब्ध होऊ शकली नाही. सायंकाळ पर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे'' अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात यांनी दिली. लसीचा तुटवडा होऊ देऊ नये तसेच त्वरित लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT