vaibhav vaman sakal
पुणे

वैभव वामने पटकाविला मिस्टर 'महाराष्ट्र'चा किताब

लोहगावमधील वैभव वामने याने मिस्टर महाराष्ट्र हा किताब मिळवल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

रामवाडी : लोहगावमधील वैभव वामने याने मिस्टर महाराष्ट्र हा किताब मिळवल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. विशेष म्हणजे स्पर्धेच्या आधी वैभवच्या हाताला दुखापत झाली असताना त्याने पहिल्याच प्रयत्नात मिस्टर महाराष्ट्र हा किताब मिळविला. स्टार लाईफ प्रोडक्शन यांनी मिस्टर अँड मिस इंडिया २०२१ फॅशन शो आग्रा याठिकाणी आयोजित केला होता.

फॅशनमध्ये आवड निर्माण झाल्यानंतर वैभवने स्वतः घरी सराव केला होता. देशातील मोठया शहरात स्टार लाइफ प्रॉडक्शनच्या वतीने मिस्टर इंडिया २०२१ ऑडिशन घेण्यात आले होते. त्यामध्ये त्याची निवड झाल्यानंतर आग्रा याठिकाणी झालेल्या स्पर्धेत त्याने मिस्टर महाराष्ट्र हा किताब मिळविला. आग्रा याठिकाणी झालेल्या स्पर्धेत एकूण ४५ मुले-मुली सहभागी झाले होते. या शोचे फाऊडर हेमंत गर्ग होते.

फॅशन कोरिओग्राफर आणि रनवे डिझायनर किजार हुसेन होते। मेन्टर आणि ग्रुमर अजय तिवारी, श्वेतसिंग चौधरी यांनी वैभवला स्पर्धेसाठी तयार केले. बिपिन अग्रवाल, मोनिका दत्ता यांनी तयार केलेले ड्रेस वैभवने परिधान केले होते.

मिस्टर इंडिया २०२१ ही स्पर्धा माझ्यासाठी खुप आनंद देणारी ठरली आहे. भविष्यात माझ्या रूपाने देशाला एक नवीन मॉडेल म्हणून चेहरा मिळेल यासाठी मी विशेष प्रयत्न करून देशाचे नाव उज्ज्वल करेल असा निश्चय वैभव वामने याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT