Vasant_Dada_Patil 
पुणे

सांगवीकरांच्या मागणीला आले यश; वसंतदादा पाटील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी (पुणे) : गेल्या वर्षभरापासून या ना त्या कारणामुळे जुनी सांगवीचे पूर्व प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या पद्मविभुषण वसंत दादा पाटील पुतळा परिसराचे अंतिम टप्प्यात काम प्रगतिपथावर असून या चौकातील सुशोभिकणामुळे जुनी सांगवीच्या सौंदर्यात भर पडली आहे.

गेली दोन वर्षापासून या पुतळा परिसराचे सुशोभिकरण व्हावे, अशी जुनी सांगवीकरांची मागणी होती. याचे पालिका स्थापत्य विभागाकडून गेल्या वर्षी कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, पुन्हा लॉकडाऊनमुळे काम थांबल्याने हा पुतळा परिसर झाकण्यात आला होता. याचे पुन्हा काम सुरू करण्यात येऊन ते सध्या अंतिम टप्प्यात प्रगतीपथावर आहे. येथे जुने बांधकाम काढून नवीन ग्रेनाईट मार्बल भिंती आणि सुशोभिकरण करण्यात आल्याने दापोडी सांगवीला जोडणाऱ्या पवना नदीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ हा पुतळा चौक गेली अनेक वर्षापासून जुनी सांगवीचे पूर्व प्रवेशद्वार अशी ओळख सांगत उभा आहे. सुशोभिरणामुळे येथील सौंदर्यात भर पडली आहे.

येथे पीएमपीएलचा सांगवीकरांचा मुख्य थांबा आहे. एरव्ही येथून पुणे आणि नगरमध्ये जवळपास पन्नास गाड्यांच्या बस फेऱ्या होतात. नागरीकांची मागणी आणि येथील दुरवस्थेच्या प्रश्नाचा पाठपुरावा सकाळमाध्यमातून वेळोवेळी करण्यात आला होता. तर हा पुतळा २३ मे १९८५ रोजी सांगवी पुतळा समितीच्या वतीने महापालिकेस भेट देण्यात आला होता. याचे तत्कालीन विधानपरिषद अध्यक्ष जयवंतराव टिळक, दुग्धविकासमंत्री अनंतराव थोपटे, लक्ष्मणशास्त्री जोशी, अशोक मोहोळ आदींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर सद्यस्थितीत या पुतळ्याचे नव्याने अठरा लाख रूपये खर्च करून येथे ग्रेनाईट, छत, विद्युतीकरण असे सुशोभिकरण करण्यात आल्याने सांगवीच्या सौंदर्यात भर पडली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Farjan Dordi : बाबा फर्जनच्या घरातून जप्त केली सव्वा पाच कोटींची 'माया'; पण ती मोजताना बँक कर्मचारी अन् पोलिसांची का झाली दमछाक? बंगल्यावर रायफल, 6 हजार काडतूसंही सापडली

Women Farmers success story: महिला शक्तीचा नवा आदर्श! वरखेडीतील महिला गटाने इस्रायली तंत्रज्ञानातून फुलवली आधुनिक शेती, गटशेतीची यशोगाथा..

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्यूनिंग वहिनींसोबतही आहे - सुनील तटकरे

Hormuz Strait बंद, भारतात पुन्हा गॅस सिलिंडरचा तुटवडा होईल? | LPG, Petrol-Dieselवर नेमका काय परिणाम?

Nashik Crime: लाडकी बहीणच्या पैशातून दागिने घेण्याचं आमिष दाखवलं, महिलेला पळवून नेत अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT