Vehicles 
पुणे

पुणे : पाषाणमध्ये अज्ञात टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा

औंध : पाषाण येथील लमाणवस्तीत दहा ते बारा जणांच्या अज्ञात टोळक्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार केल्याची घटना गुरूवारी (ता.3) पहाटे दोन वाजेच्या दरम्यान घडली.

लमाण वस्तीतील रस्त्यावर लावण्यात आलेल्या चारचाकी तसेच दुचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न या टोळक्याकडून केला गेला. या घटनेत 12 चारचाकी व 3 दुचाकींचे नुकसान झाले आहे. तोडफोड केलेल्या वाहनात इनोव्हासारख्या महागड्या गाड्यांसह शालेय बस, रिक्षा, टेम्पो तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे.

पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्वरित घटनास्थळी जाऊन गाड्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. रात्रीच्या वेळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरामधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सामान्य नागरीकांनी कष्टातून पै पै जमा करून घेतलेल्या गाड्यांची तोडफोड केल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित गाड्यांची तोडफोड कोणी व का केली? याचा शोध चतु:शृंगी पोलीस घेत आहेत. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेत अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून अज्ञात तरूणांनी हा प्रकार पुर्ववैमनस्यातून केल्याचा अंदाज असल्याचे चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले. पुढील तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT