narendra bhide main.jpg 
पुणे

संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे : मराठी चित्रपट आणि नाटकांना आपल्या संगीताने सजविणारे संगीतकार नरेंद्र भिडे (वय 47) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाकडून निर्णय झाला, न्याय नाही : पासलकर​

सिव्हिल इंजिनियरची पदवी घेऊनही भिडे यांनी करियरसाठी संगीत क्षेत्र निवडले. अनेक नाटके, मालिका, मराठी चित्रपटांना त्यांन संगीतबद्ध केले. माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे घेतले. त्यांना सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

नरेंद्र भिडे यांनी आगामी सरसेनापती हंबीरराव, मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट , अनुमती , दिल ए नादान (बायोस्कोप) , देऊळ बंद कलम 302, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी, मालक, मसाला, समुद्र, चाँद फिर निकला (हिन्दी), श्वास, सरीवर सरी, माती माय सह अनेक चित्रपटांना संगीत दिले.

ट्रम्प आणि एलियन्सची युती? इस्त्राईलच्या माजी अंतराळ प्रमुखांचा धक्कादायक दावा​

कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस , व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि 40 चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस, संगीत गर्वनिर्वाण या नाटकांनाही त्यांनी संगीत दिले आहे. 

भिडे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी 9.30 वाजता कर्वेनगर येथील त्यांच्या डॉन स्टुडिओ, येथे ठेवण्यात येणार आहे. नंतर सकाळी अकरा वाजता वैकुंठ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत, असे निकटवर्तीयांनी कळविले आहे.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT