Pune-University 
पुणे

Covid 19 : 'आपत्ती व्यवस्थापन' अभियानातील विद्यार्थ्यांशी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे कुलगुरू साधणार संवाद!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) कार्यक्रमांतर्गत ‘कोविड १९ आपत्ती व्यवस्थापन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात सहभागी असलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांशी येत्या शनिवारी (ता.२५) कुलगुरू डॉ. नितीन करमळकर ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे संवाद साधणार आहेत.

विद्यापीठाने सुरू केलेल्या या उपक्रमात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यांमधील ५३ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेचा उपयोग करून मास्क तयार करणे, सॅनिटायझरची निर्मिती करणे, रक्तदात्यांची यादी तयार करणे, गरजू कुटुंबांचे सर्वेक्षण करणे असे उपक्रम यापूर्वीच हाती घेतले आहेत.

या सर्व विद्यार्थी आणि एन.एस.एस. प्रकल्प अधिकारी यांच्याशी कुलगुरू संवाद साधणार आहेत. त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हा या संवादामागचा उद्देश आल्याचे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

Varandha Ghat Closed : पुणे-रायगड प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट; 'या' तारखेपर्यंत वरंध घाट राहणार बंद! जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT