diwali festival womens self help groups diwali festival womens self help groups
पुणे

Vidhansabha Code of Conduct : विधानसभा आचारसंहितेचे बचत गटाच्या लाडक्या बहिणींवर घोंघावतय आर्थिक संकट

पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी ‘दिवाळी बचत बाजार’ आयोजित केला जातो, त्यातून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी दिवाळीच्या पूर्वी ‘दिवाळी बचत बाजार’ आयोजित केला जातो, त्यातून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल होत असल्याने बचत गटांना मोठा आर्थिक हातभार लागतो. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर महापालिकेच्या जागेत हा बचत बाजार आयोजित करता येणार नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे बचत गटाच्या ‘लाडक्या बहिणींवर आर्थिक संकट घोंघावत आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचतगटांना अनुदान दिले जाते. या बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी महापालिका शहराच्या विविध भागात प्रदर्शनाचे आयोजन करते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनास होता प्रतिसाद मिळतो.

त्यामध्ये संसार उपयोगी वस्तू, चकली, करंजी, लाडू, चिवडा, शंकरपाळी असा दिवाळीचा फराळ, कपडे, शोभेच्या वस्ती, पर्स यासह आदी उत्पादने या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवलेले असतात. सुमारे चार दिवसाच्या या प्रदर्शनात ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल होते.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या काही दिवसांमध्ये लागू होणार आहे. तो पर्यंत महापालिकेला प्रदर्शनासाठी जाहिरात देणे, अन्य तयारी करणे शक्य नाही. त्यामुळे यंदाचे प्रदर्शन घेण्याबाबत प्रशासनात शाशंकता आहे. आचारसंहितेत प्रदर्शन घ्यायचे असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यास लगेच प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत शाश्‍वती नाही. या गोंधळात महिलांचे मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता आहे.

‘विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नियमांचे तंतोतंत पालन करून दिवाळी बचत बाजारचे आयोजन करता येईल का याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.’

- नितीन उदास, उपायुक्त, समाज विकास विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT