Anandraj-Ambedkar 
पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार प्रतिकात्मक

सकाळवृत्तसेवा

कोरेगाव भीमा - एक जानेवारीला कोरेगाव भीमालगत पेरणे फाटा येथे दरवर्षी होणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यंदा कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर घरातूनच अभिवादन करून साजरा करुया, असे आवाहन प्रशासनाने केले असून परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सुचनांही दिल्या आहेत. दरम्यान आज रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनीही ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी भेट देवून अभिवादन केले.

दरम्यान, आनंदराज आंबेडकर यांनी आज विजयस्तंभस्थळी भेट देवून वरीष्ठ पोलिस अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे, पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरेगाव भीमा नजिक पेरणेफाटा येथे दर वर्षी एक जानेवारी रोजी शौर्यदिन साजरा केला जात असताना देशभरातून लाखो अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. मात्र सध्याची कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची परिस्थिती पाहता सर्वच उत्सव, कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात साजरे करावे लागलेले आहेत. 

अशाच प्रकारे या वर्षीचा एक जानेवारी २०२१ रोजी होणारा विजयस्तंभ कार्यक्रमही जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, कोरेगाव भीमा विजयस्तंभ समितीच्या माध्यमातून प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले असून दिक्षाभूमी, चैत्यभूमी प्रमाणेच येथेही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनीही केले आहे.

शासनाचे परिपत्रक जाहीर...
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाबाबत शासनाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक काढले असून या परिपत्रकानुसार कोरोनोच्या पार्श्वभुमीवर येथे गर्दीवर निर्बंध असल्याने हा कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे दुरदर्शन तसेच इतर माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून येथे सभा व स्टॉलवरही निर्बंध घालण्यात येणार आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return: वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT