Viral Mardani Grandmothers training center started in Hadapsar Pune 
पुणे

करुन दाखवलं; मर्दानी आजीचं पुण्यात ट्रेनिंग सेंटर सुरु

संदिप जगदाळे

हडपसर : गोसावीवस्ती येथील 'वॉरिअर आजी' शांताबाई पवार यांचे ट्रेनिंग सेंटर सुरु करण्याबाबत अभिनेता सोनूने सूदने दिलेला आपला शब्द पाळला आहे. पण ही मदत आर्थिक स्वरुपाची नसून स्वाभिमानाने जगायला देणारी आहे. मुला-मुलींना स्वसंरक्षण करण्यासाठी मोफत लाठी-काठीचे प्रशिक्षण या आजी देणार आहेत. त्यासाठी त्यांना सोनू सूद यांच्याकडून दरमहा १२ हजार रूपये मानधन देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सानेनगर येथील सावली फांउडेशनने यासाठी संस्थेची जागा मोफत उपल्बध करून दिली आहे. तर मुंबई येथील ‘निर्मिती’ फांउडेशनचे सहकार्य या ट्रेनिंग सेंटरला मिळाले आहे. या केंद्राचे उदघाटन सावली फांउडेशनचे अध्यक्ष नगरसेवक योगेश ससाणे यांच्या हस्ते शनिवारी झाले. याप्रसंगी नंदीनी जाधव, निर्मीता फांउडेशनचे कार्यकर्ते मनोज खरे, निलेश शेळके, रोहित सकपाळ, हर्षाली खरे, सुरज खरे, मयुर घायवट, सनी साळवे, मिलींद राऊत, श्री जोशी आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या हडपसर येथील 85 वर्षांच्या आजीबाई सोशल मीडियावर स्टार झाल्या. त्यानंतर ‘वॉरिअर आजी’ अशी ओळख मिळालेल्या शांताबाई पवार यांना मदत करण्याची इच्छा अभिनेता सोनू सूद यांनी व्यक्त केली होती. “या आजींचे काही तपशील मिळू शकतील का? त्यांच्याबरोबर एक लहान प्रशिक्षण शाळा सुरु करायची आहे. जिथे त्या आपल्या देशातील महिलांना काही आत्मसंरक्षणाचे तंत्र शिकवू शकतील.” असे ट्वीट सोनू सूदने केले होते.

सावली फांउडेशनचे अध्यक्ष योगेश ससाणे म्हणाले, सावली फांउडेशनची जागा या प्रशिक्षण केंद्रासाठी भाड्याने दयावी अशी सोनू सूद यांनी विनंती केली. मात्र, आम्हाला भाडे नको, पण या सेंटरमध्ये मुला-मुलांना मोफत प्रशिक्षण देण्याची अट मी त्यांना घातली. त्यानुसार या जागेत आठवडयातून तिन दिवस आजी प्रशिक्षण देणार आहेत.  

शांताबाई पवार म्हणाल्या, उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे दहा अनाथ मुलींचा सांभाळ करते, तिघींना लग्न करुन सासरी पाठवले. कोरोनाची भीती होती, मात्र फिकीर न करता घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले, “काही वर्षांपूर्वी तारेवर चालताना पाय मोडला होता, तर बाटलीवर तोल सांभाळताना पडून हाताला दुखापत झालेली. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली, हात अजूनही दुखतो, तरीही जिद्दीने हे खेळ अजूनही खेळते आणि पोटाची खळगी भरते” अभिनेता सोनू यांच्या पुढाकारातून मुला-मुलींना लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्यासाठी माझी निवड झाल्याने मी खूप खूष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT