Pune-Police 
पुणे

Coronavirus : 'लॉकडाऊन'बाबतचा 'तो' व्हिडिओ पुण्यातील नाही : डॉ. शिसवे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला असताना सोमवारी (ता.३०) "३१ मार्चपासून तीन दिवस शहरे १०० टक्के बंद राहणार," असा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र, हा व्हिडिओ पुण्यातील नाही, नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. असे असताना सोमवारी सोशल मीडियावर "मंगळवारी ३१ मार्च पासून शहरे पुढील तीन दिवस १०० टक्के बंद राहणार," असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये दूध वगळता पालेभाज्या, किराणा मालाची दुकाने बंद असणार आहेत, तर दवाखाने सुरु राहणार असल्याचे सांगितले जात होते.

याविषयी डॉ. शिसवे म्हणाले, "संबंधित व्हिडीओ पुण्यातील नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. पुण्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थापने बंद असणार आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सोशल डिस्टन्स पाळावा. तसेच घरातच राहावे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

Ajit Doval Gen Z : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी Gen Z वर केले वक्तव्य; पुण्यातील कार्यक्रमात युवकांना उद्देशून भाषण

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

माझ्या कृतीची लाज वाटते, जे बोलले ते माफीलायक नव्हतं; PM मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीचा माफिनामा

Amit Shah : "गुजरातमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरेंद्र मोदी CM..."; अमित शहांनी सांगितला अजित डोवाल यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा

SCROLL FOR NEXT