Voting by ballot was right and once again it's proved in the graduate constituency election said nana Patole
Voting by ballot was right and once again it's proved in the graduate constituency election said nana Patole 
पुणे

बॅलेटद्वारे झालेले मतदान योग्य; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत हे पुन्हा सिद्ध : नाना पटोले

सकाळवृत्तसेवा

आळंदी : लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत कुठे जातेय हे समजून घेण्याचा अधिकार मतदात्याला आहे. नुकतेच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या माध्यमातून बॅलेटद्वारे झालेले मतदान योग्य आहे हे पुन्हा सिद्ध झाले. आता लोकच मागणी करत आहेत ही ईव्हीम बंद करून बॅलेटवर मतदान घ्या. त्यामुळे लोकांचा कल पाहून केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून निवडणूक पद्धतीत निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आळंदीत सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीबाबत आढावा घेण्यासाठी आणि वारकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी पटोले आळंदीत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ.अभय टिळक, अॅड विकास ढगे, योगेश देसाई, निलेश लोंढे, संजय घुंडरे, डि.डी.भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, राम गावडे, नंदकुमार वडगावकर, संदिप नाईकरे, गोविंद गोरे, बाळासाहेब रावडे, मुख्याधिकारी अंकूश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे पटोले म्हणाले, ''आम्ही कुणाला मतदान दिले लोकांना समजले पाहिजे. लोकशीहीतील ही व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे देश कृषिप्रधान आहे. २०१७ ला मी राजीनामा दिल्यानंतर शेती आणि कायद्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली. केंद्र सरकारने सध्या लादत असलेला शेती कायद्यास बहूतांश ठिकाणी विरोध केला जात आहे. विरोधी पक्षाने विरोध केला तर सत्ताधारी त्याला भूमिकेला राजकिय मानतात. दिल्लीतील कडाक्याची थंडी असूनही लाखो शेतकरी रस्त्यावर बसून आहे. सरकारकडून केवळ बैठकीच्या फेऱ्या सुरू असून आतापर्यंत चार फेऱ्या झाल्या. मात्र दिलासादायक निर्णय अद्याप नाही. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच या प्रश्नात लक्ष घालणे आवश्यक बनले आहे. केंद्रिय मंत्री मंडळातील अनेक मंत्रीही शेतकऱ्यांच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत. सुधारणा करण्याचे मंत्र्याने मान्य केले.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

शेतकऱ्यांसोबत झालेली मागण्याबाबतची चर्चा लिखित रूपात बदल करून प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे. अन्नदात्याला थंडीत न्याय हक्कासाठी रस्त्यावर बसतो हे देशाच्या कृषीप्रधान संस्कृतिक बसत नसल्याची टिकाही केंद्र सरकारबाबत पटोले यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT