भरधाव ट्रकच्या धडकेत
वृद्धाचा जागीच मृत्यू
वागदरी (ता. अक्कलकोट) येथील घटना
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. ३० : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील आंबेडकर चौकात रस्त्याने चालत जाणाऱ्या ५४ वर्षीय वृद्धास पाठीमागून भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २९) दुपारी चारच्या सुमारास घडली.
महादेव दुध्याप्पा नडगेरी (वय ५४, रा. वागदरी, ता. अक्कलकोट) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा सुनील नडगेरी (वय ३०) यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आळंदहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या ट्रकने (केए २९ सी ४१०६) रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या महादेव नडगेरी यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर पडले असता ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रकचा पाठलाग करून वाहन अडवले. ट्रक चालक अमरिश रामचंद्र गुजुरुके (वय ३६, रा. रामनगर, कलबुर्गी, कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.