In Walhekarwadi Chinchwad Nagar citizens closed internal roads due to corona Virus  
पुणे

Corona Virus : वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगरमध्ये नागरिकांनी अंतर्गत रस्ते स्वयंस्फूर्तीने केले बंद

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू लागल्याने नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होऊ लागली आहे. शहरातील वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर या भागातील नागरिकांनी आपल्या परिसरातील अंतर्गत रस्ते स्वयंस्फूर्तीने वाहतुकीसाठी आणि भाजीपाला विक्रेत्यांसाठी बंद केले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जय गणेश कॉलनी, पंचरत्न कॉलनी, सिध्दिविनायक कॉलनी, नवसंजीवन कॉलनी, या भागातील नागरिकांनी सोसायटीमध्ये येणारे रस्ते बांबू, पत्रे लावून बंद केले आहेत. या भागातील नागरिकां व्यतिरिक्‍त अन्य कोणत्याही लोकांना इथे प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वाल्हेकरवाडी परिसरातील एका सोसायटीने पाइप, वाळलेली झाडे झुडपे यांचा आसरा घेत रस्ता वाहतूकीसाठी बंद केला आहे. चिखली भागातही अनेक ठिकाणी अशा प्रकारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
 
Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास
नागरिकांनी स्वताहून पुढाकार घेत अनेक ठिकाणी हा उपक्रम राबवत असल्यामुळे या चिंचोळ्या गल्लीमधून होणारी दुचाकी वाहनांची ये-जा पूर्णपणे थांबली असून नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे.

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : विहीरीत पडलेल्या हरणास शेतकऱ्यांनी दिले जीवदान

SCROLL FOR NEXT