Crime_Pune 
पुणे

वॉचमन त्याच घरात दुसऱ्यांदा चोरी करायला गेला अन्...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घर मालक अमेरिकेला गेलेले असताना पाच वर्षांपूर्वी केलेल्या चोरीची वॉचमनने आता कबुली दिली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा चोरी करत असताना पकडले गेल्यानंतर त्याने आधीच्या चोरीची माहिती पोलिसांना दिली.

या प्रकरणी योगिता प्रभाकर मोडक (वय ७०) यांनी डेक्कन पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ बंडू बनसोडे (वय ४८, रा. भूगाव) याला अटक झाली. फिर्यादी या प्रभात रस्त्यावर ग्रीनपार्क या सदनिकेत राहतात. फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी बनसोडे हा पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता.

गुरुवारी (ता.३०) सकाळी साडेसहा वाजता तो बाल्कनीतून घरात घुसत असल्याचे फिर्यादी यांनी पाहिले. फिर्यादी यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये फिर्यादीच्या डाव्या हाताला जखम झाली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारचे रहिवाशी मदतीला धावून आले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सोपवले. 
फिर्यादी महिला त्यांच्या पतीसमवेत घटनास्थळी राहतात. त्यांचा ऍटोमोबाइल पार्टचा व्यवसाय आहे. त्याचा एक मुलगा अमेरिकेत, तर मुलगी पुण्यातच राहते.

पाच वर्षांपूर्वी हे दाम्पत्य अमेरिकेला मुलाकडे गेल्यावर बनसोडेने त्यांच्या घरी चोरी केली होती. यामध्ये सात ते आठ लाखांचे दागिने चोरले होते. मात्र, बनसोडे गेल्या १० वर्षांपासून तेथे कामाला असल्याने त्याच्यावर संशय आला नव्हता, पण तो दुसऱ्यांदा चोरी करत असताना पकडला गेला. पोलिसांनी त्याच्याकडे आधीच्या चोरीबाबत चौकशी केली असता त्याने कबुली दिली. या प्रकरणाचा तपास डेक्कन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सी. एम. सूर्यवंशी करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT