Water Supply - नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने व उपलब्ध पाणीसाठा मर्यादीत असल्याने रविवारपासून (ता. 9) बारामतीला एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. पुढील आवर्तन सुरु होईपर्यंत असाच एका दिवसाआड होणार आहे.
शहरातील पिण्याच्या पाण्याचे वाटप पुढीलप्रमाणे होणार
सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, नीरा डावा कालव्याचे चालु आर्वतन बंद झाल्याने व उपलब्ध पाणीसाठा मर्यादीत असल्याने पाणी पुरवठा एक दिवसाआड करावा लागणार आहे. पुढील आवर्तन मिळे पर्यंत एक दिवसाआड पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे ते खालीलप्रमाणे.
रविवारी (ता. 9) खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही. तद्नंतर दिवसाआड पाणी पुरवठा होईल.- कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रियनगर, मेडदरोड, पतंगशाहनगर, महादेव मळा, सदगुरुनगर, अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, वसंतनगर,
अवधुतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, विट्टलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर इत्यादी
सोमवारी (ता. 10) खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही. त्या नंतर दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.- कचेरी रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबीर बोळ महावीर पथ, सिध्देश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांडुळवाडी वेस चौक, बुरुड गल्ली,नेवसे रोड- संपुर्ण कसबा, लक्ष्मीनारायणनगर, माळेगाव रोड, जामदार रोड, खंडोबानगर,
जवाहरनगर, पोष्ट रोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, सिध्दार्थनगर, नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.