bhagat-singh-koshyari 
पुणे

कोरोना महामारीच्या या आव्हानाला आपण सर्वांनी संधी म्हणून पाहायला हवे : भगतसिंह  कोश्यारी

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'कोरोनाच्या संकट काळात सर्वांनी समर्पणाच्या भावनेतून काम केल्यास आपण नक्कीच कोरोनाला हरवू शकतो. कोरोना महामारीच्या या आव्हानाला आपण सर्वांनी संधी म्हणून पाहायला हवे", असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठाचा ११७ वा पदवी प्रदान समारंभ ऑनलाईन पध्दतीने गुरुवारी झाला. त्यावेळी कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमात फोर्ब्स मार्शल प्रायव्हेट लिमिटेडचे सह-अध्यक्ष डॉ. नौशाद डी. फोर्ब्स, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर , प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे,  विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

कोश्यारी म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय शिक्षणाची एक सर्वोत्तम संकल्पना आहे. या संकल्पनेला प्रोत्साहन दिले गेल्यास विद्यार्थ्यांना सर्व विद्याशाखांमधील ज्ञान मिळू शकते. शिवाय एखादा विद्यार्थी त्याला हवे त्या विषयात स्पेशलायझेशन करू शकतो."  अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार हा योग्य निर्णय असल्याचेही कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.  

डॉ. नौशाद डी. फोर्ब्स विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, चांगल्या विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला आपोआप वेगळ्या व आकर्षक संधी उपलब्ध होतात. आपण प्रत्येकाने आपलं काम आनंदाने करायला हवे.

तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात आनंद मिळत नसल्यास तातडीने ते थांबवा. आपल्यापैकी बरेच जण इतरांचे ऐकून त्यांची अभ्यासक्रम आणि करिअरची निवड करतात. ते योग्य नाही. आपण इंजिनिअरिंगला जितके महत्व देतो तितकेच इंग्लिश या विषयाला द्यायला हवे, तसेच मेडिसिन इतकेच महत्व इतिहास विषयाला द्यायला हवे. आणि हेच तत्व अध्यापन, सरकारी सेवा, बँकिंग यामध्येही लागू होते. तुम्हाला जर औद्योगिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर कंपनीच्या प्रसिद्धीपेक्षा तिच्या गुणवत्तेला तुम्ही प्राधान्य द्यायला हवे."

यावेळी डॉ. करमळकर यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम आणि योजनांची माहिती दिली.

विद्यापीठाच्या वतीने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात आणि तत्पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण सात हजार ३५  विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पुढील १५ दिवसांमध्ये पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येतील. त्यापैकी १०४ पीएच. डी. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले विद्यार्थी आहेत, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरुपात पदवी प्रमाणपत्र प्रदान केलेले पीएच. डी. विद्यार्थी :
विद्याशाखा : विद्यार्थ्यांची नावे

विज्ञान व तंत्रज्ञान शाखा : संदीप नेवसे,  रमेश कवडे 
वाणिज्य व व्यवस्थापन शाखा : श्रुती गणपुले, मनोज मेघराजानी 
मानवविज्ञान विद्याशाखा : पूर्णिमा कुलकर्णी , सुनीता बच्छाव 
आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा : अर्चना गोसावी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT