Satyajeet Tambe_ Devendra Fadnavis 
पुणे

Fadnais on Satyajeet Tambe: "सत्यजीत तांबेंचं काम चांगलं, योग्यवेळी निर्णय घेऊ"; फडणवीसांनी तापवलं वातावरण

भाजपनं उमेदवार का दिला नाही याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी नाशिकमध्ये काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गुरुवारी बराच राजकीय ड्रामा पहायला मिळाला. या प्रकरणात भाजपची चर्चा सुरु झाली ती अद्यापही कायम आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांचं कौतुक करताना योग्यवेळी आम्ही निर्णय घेऊ, अशा शब्दांत त्यांनी पुन्हा वातावरण तापवलं आहे. (We will take decision at right time Devendra Fadnavis on Satyajeet Tambe)

फडणवीस म्हणाले, नाशिकच्या पदवीधर मतदारसंघासाठी आमचं नेमकं धोरण काय आहे? हे बावनकुळे यांनी काल सांगितलं आहे. त्यामुळं योग्यवेळी आम्ही यावर निर्णय करु. सत्यजीत तांबेंचं नेता, व्यक्ती आणि युवा नेता म्हणून काम निश्चितपणे चांगलं आहे. परंतू शेवटी सगळे राजकीय निर्णय धोरणांप्रमाणं करावे लागतात. याबाबत बावनकुळे यांनी काल सांगितलं.

फडणवीसांचं धक्कातंत्र?

मध्यंतरी सत्याजीत तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यामुळं नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणं आणि भाजपनं तिथं उमेदवार न देणं हे फडणवीसांचंच धक्कातंत्र असल्याचं बोललं जात आहे. इतकेच नव्हे तर तांबे हेच भाजपचे उमेदवार असतील असंही सर्वांना वाटत होतं. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, राजकीय क्षेत्रात एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणं हे काही नवीन नाही. आजचा जो काही घटनाक्रम तुम्हाला वाटतो तसा नाही योग्यवेळी तो तुमच्यासमोर येईल.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

भाजपनं का दिला नाही उमेदवार?

शेवटी आम्ही देखील तिकडे कोण उमेदवार द्यावा याच्या विचारात होतो. यासाठी राजेंद्र विखेंनी तिथं उमेदवारी घ्यावी अशी आमची इच्छा होती. त्यासंदर्भात राजेंद्र विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्याशी आमची चर्चा सुरु होती. पण काही कारणांनी त्यांनी असमर्थता दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT