ncp-b.jpg 
पुणे

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रिया बेर्डे म्हणाल्या...

सकाळवृत्तसेवा

पुणे ः चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टिस्ट यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ज्येष्ठ कलाकारांचे मानधन वाढविणे, राज्य सरकारच्या जाहिरातींमध्ये मराठी कलाकारांना प्राधान्य मिळवून देणे, टिव्ही मालिकांमधील कलाकारांचे मानधन 90 वरून 30 दिवसांवर आणणे, कर्मचाऱयांच्या शिफ्ट 8 तासांच्या करणे, याला माझे प्राधान्य असेल, असे चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना सांगितले. 

बेर्डे यांच्यासमवेत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, लावणी कलावंत शकुंतला नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक-दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे यांनी या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. हे सर्वजण पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहेत. 

बेर्डे यांचे स्वागत करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे एक कुटुंब आहे. त्यात आता चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे आणि अन्य कलाकार, सहभागी झाले आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्याची पक्षाची भूमिका असेल. चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून समाजकारण करण्यात येणार आहे.

यावेळी खासदार सुळे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवर्जुन उल्लेख केला. त्यांचा चाहता वर्ग अजूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचे चाहत्यांशी प्रेमाचे नाते आहे आणि चाहते अजूनही त्यांच्या प्रेमात आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात पक्ष प्रवेश ही चांगली बातमी आहे. या कलाकारांच्या माध्यमातून आता त्यांचे प्रश्न नक्कीच सोडवू, असेही सुळे यांनी सांगितले. 

यावेळी बेर्डे यांनी आगामी काळातील वाटचाल स्पष्ट करताना आपण मुंबई- पुण्यासह राज्यातील सर्वच ठिकाणचे लोककलावंत, कर्मचारी यांचे प्रश्न सोडविणार आहेत, असे सांगितले. या प्रसंगी प्रदेश महिलाध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सांस्कृतिक विभागाचे कार्याध्यक्ष बाबा पाटील आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

Gold rate Today: नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज १ तोळ्याचा भाव किती?

Maternal Health : जिल्ह्यात ५ वर्षांत ३३ मातांचा मृत्यू; जिल्हा आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT