Weather Update forecast Highest summer temperature crossed 40 degree  sakal
पुणे

Weather Update : उन्हाळ्यातील आजवरचे सर्वाधिक तापमान

शहरात कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली;

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एकीकडे अवकाळी पाऊस धुमाकुळ घालत असतानाचा शहरात उन्हाचे चटके वाढत आहे. बुधवारी कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असून, उन्हाळ्यातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे पुणेकरांची लाहीलाही होत असून, रात्री गारवा आणि दिवसा कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिकांना आता वैशाख वणवा जाणवायला लागला आहे. सकाळी आकाश अंशतः ढगाळ जरी असले, तरी शहरातील किमान तापमान चाळीस अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते. बुधवारी दुपारी १२ ते चार वाजेच्या दरम्यान पडलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे उष्णतेच्या लाटे सदृष्य स्थिती निर्माण झाली होती.

कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक उन्हाच्या झळांमुळे बेजार होत आहे. तर दुचाकीवरील प्रवासही नकोसा झाल्‍याचे अनेकजण सांगतात. पुढील आठवडाभर तरी पुणे व परिसरात आकाश दुपारनंतर अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच कमाल तापमानाही ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार आहे.

राज्यातही उन्हाचा चटका वाढला

अवकाळी पावसाने उघडीप देताच, राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. सूर्य तळपल्याने विदर्भात तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पार गेला आहे. उन्हाच्या चटक्या बरोबरच उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. गुरूवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात कडक उन्हाळा जाणवू लागला असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा आणि यवतमाळ येथे तापमान ४३ अंशांच्या पार गेले आहे.

तर अकोला, अमरावती, वाशीम येथे तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर सरकला आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३४ ते ४२ अंशांच्या दरम्यान असून, किमान तापमान १९ ते २७ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नैॡत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. गुरूवारी (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा कायम आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : अमेरिका पाकिस्तानला मदत का करते? माजी CIA एजंटकडून स्वत:च्याच सरकारची पोलखोल; देशाला हादरवणारी माहिती समोर...

Divyang Niradhar Yojana: मोठी घोषणा! निराधार लाभार्थींना आता मिळणार महिन्याला 2500 रुपये; वाचा काय आहेत अटी?

Latest Marathi News Live Update: लहान मुलाचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

Brazil Drug Bust : ट्रकच्या टायरमध्ये लपवला होता ३५० कोटींचा माल, चाणाक्ष कुत्र्यामुळे मोठे रॅकेट उघड, नेमकं काय घडलं?

राज्यात वीज दर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमाफीवरही बोलले

SCROLL FOR NEXT