jejuri corona 
पुणे

जेजुरीत भंडारा उधळला, देवासाठी नव्हे तर कोरोना योद्ध्यासाठी 

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणारे जेजुरीतील डॉ. प्रशांत सुभाष दरेकर यांनीही स्वतः कोरोनावर मात केली आहे. या कोरोना योध्दाचा जेजुरीतील विविध संस्था व संघटेनांच्यावतीने भंडारा उधळून जोरदार स्वागत व सन्मान करण्यात आला.

जेजुरी येथील डॉ. प्रशांत सुभाष दरेकर हे ससून रुग्णालयात कोरोना रुग्णावर २१ दिवस उपचार करत होते. रुग्णांवर उपचार करत असताना त्यांनाही कोरोनाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यावर मात करण्यात यशस्वी ठरल्यानंतर ते जेजुरीत आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
त्यांचे जेजुरीत आगमन होताच मार्तंड देवसंस्थान,सुवर्ण स्टार सोशल क्लब, जेजुरी मेडिकल असोसिएशन, संभाजी ब्रिगेड, श्रीराम मित्र मंडळ, नगरसेवक जयदीप बारभाई व नागरिकांनी भंडारा व पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जयमल्हार...असा जयघोष युवकांनी केला.

 
डॉ. दरेकर यांनी ससून येथे अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत कित्येक रुग्णांना कोरोनातून मुक्त केले. स्वतःवर वेळ आल्यावरही ते त्यातून बाहेर पडले. या निमित्ताने समस्त जेजुरीकरांनी त्यांचे जोरदार स्वागत केल्यानंतर त्याच्या परिवाराने आनंद व्यक्त केला. त्यांच्या आई, वाहिनी, आत्या यांना अश्रू आवरता आले नाही. मित्र परिवाराने जोरदार टाळ्या वाजवत या योध्दाला सलाम केला. कोरोनाला घाबरून जाऊ नका, तो बरा होतो, असा संदेश डॉ. प्रशांत दरेकर यांनी या वेळी दिला.
 


देवसंस्थान विश्वस्त प्रमुख संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, डॉ. नितीन केंजळे, उद्योजक सुभाष दरेकर, जय मल्हार पतसंस्थेचे सचिव बाळासाहेब दरेकर, डॉ. प्रियांका दरेकर, लोकेश सावंत, गणेश आगलावे, कृष्णा कुदळे, माउली खोमणे आदी प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: RBIच्या निर्णयापूर्वी शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्सची 269 अंकांनी उसळी, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार

Shivrajyabhishek Din 2026 : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी मोहीम फत्ते; 'हा' पायरीमार्ग पुन्हा खुला, धोकादायक दरडीही हटवल्या

Mumbai High Tide Alert : मुंबईकरांनो सावधान! यंदा पावसाळ्यात समुद्र 24 वेळा कोपणार; 'या' 6 दिवसांत मुंबई जलमय होण्याचा मोठा धोका, लाटांची उंची ऐकून धडकी भरेल

IND vs AFG, ODI: विराट कोहलीच्या बदली खेळाडूसाठी केवळ ऋतुराज गायकवाडच नाही, तर 'हे' तीन खेळाडूही शर्यतीत

SCROLL FOR NEXT