StartUP
StartUP 
पुणे

पुण्याला स्टार्टअप हब होण्यासाठी आणखी काय हवं?

सकाळवृत्तसेवा

पुणे - येथील स्टार्टअप्समध्ये वैविध्य आहे. अलिकडच्या काळात या स्टार्टअप्सनी प्रामुख्याने सायबर-सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्ज व एज्युटेक या क्षेत्रांकडे लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यात उत्तम प्रतिभा उपलब्ध असली, तरी देशातील आघाडीचे स्टार्टअप हब होण्यासाठी पुण्याला आणखी सशक्त पाठबळाची गरज आहे, असा सूर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे व परिसरातील स्टार्टअप्स व त्यांच्याशी संबंधित घटक यांचा संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने एमसीसीआयएच्या इन्क्युबेशन अँड स्टार्टअप्स समितीतर्फे शुक्रवारी (ता. १९) चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात निवडक गुंतवणूकदार (व्हेंचर कॅपिटॅलिस्ट व एंजल इन्व्हेस्टर्स) सहभागी झाले होते. त्यांनी सध्या स्टार्टअप्समध्ये होत असलेली क्षेत्र व गुंतवणूक आणि स्टार्टअप्ससाठीच्या संधी याविषयी माहिती दिली. एमसीसीआयएच्या स्टार्टअप संवाद मालिकेतील हे तिसरे सत्र होते. यापूर्वीच्या दोन सत्रांमध्ये पुण्यातील इनक्युबेशन सेंटर्स तसेच स्टार्टअप्सना साह्य करणाऱ्या खासगी कंपन्यांबाबत चर्चा करण्यात आली.

हंड्रेडएक्स.व्हीसी कंपनीचे संस्थापक, भागीदार संजय मेहता, आयडियाज टू इम्पॅक्ट इनोव्हेशन्सचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गीरेंद्र कसमळकर, इंडियन एंजल नेटवर्कचे पश्चिम भारत विभागाचे प्रमुख कांची दहिया, टीआयई पुणे एंजल्सचे उदय कोठारी, केव्हीए मॅनेजमेंट अॅडव्हायझरीचे संचालक कृष्णा अय्यर चर्चासत्रात सहभागी झाले होते. 

एमसीसीआयएच्या इन्क्युबेशन अँड स्टार्टअप्स समितीचे अध्यक्ष विश्वास महाजन यांनी प्रास्तविक केले. पुणे शहरातील विविध क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये विविध टप्प्यांवर केलेल्या गुंतवणुकीदरम्यानचे अनुभव आणि पुण्याशी संबंधित बाबींवर विचार मांडण्याची विनंती त्यांनी सहभागी तज्ज्ञांना केली.

हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) या तिन्ही क्षेत्रात प्रचंड काम करण्याची क्षमता पुण्यामध्ये आहे. मात्र, पुण्याने आपली सर्वोत्तम क्षमता अद्याप सिद्ध केलेली नाही, याकडे संजय मेहता यांनी लक्ष वेधले.

फाईव्ह जीमुळे एआय व आयओटी क्षेत्रात स्टार्टअप्ससाठी मोठ्या प्रमाणावर संधी : कसमळकर
कसमळकर यांनी त्यांच्या व्हेंचर कॅपिटल फर्मने पुण्यातील फिन-टेक हबमध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबतचा अनुभव सांगितला. येत्या काळात फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) या क्षेत्रात स्टार्टअप्ससाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होतील, असेही कसमळकर यांनी सांगितले. 

आपल्या व्यवसायावर कोव्हिड १९ चा परिणाम होऊ नये, यासाठी स्टार्टअप्सनी त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये केलेल्या बदलांची माहिती कांची दहिया यांनी दिली. त्याचबरोबर पुण्यात सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या वाढत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. उदय कोठारी यांनी टीआयईच्या नर्चर या स्टार्टअप्सना सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन करणाऱ्या सहा महिने कालावधीच्या उपक्रमाची माहिती दिली. स्टार्टअप्सना निधी उभारत असताना जाणवणाऱ्या मेट्रो-नॉन मेट्रो शहर भेदभावाविषयी कृष्णा अय्यर यांनी विचार मांडले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT