CM-Uddhav-Thackeray
CM-Uddhav-Thackeray 
पुणे

लॉकडाऊन शिथिल होणार; राज्य सरकारच्या आदेशाकडे आता लक्ष!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतीची कामे, ग्रामीण उद्योग आणि औद्योगिक वसाहती सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असल्या तरी राज्य सरकार त्या बाबतचे आदेश कधी काढणार, या कडे आता जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत केंद्र सरकारने बुधवारी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्या प्रसिद्ध करताना राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती नुसार निर्णय घ्यावेत, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. त्या मुळे राज्यात लॉकडाउनच्या काळात कोठे शिथिलता देता येईल, नेमके कोणते उद्योग-व्यवसाय सुरू करता येईल, याचा आढावा घेण्यास राज्य सरकारने सुरवात केली आहे. 

राज्य सरकारने आदेश दिल्यावर जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतील, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. पुणे शहरात बहुतेक ठिकाणी संचारबंदीसदृश्य परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे राज्याने आदेश दिल्यावर जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्याशी विचार विनिमय करून शिथिलतेबाबत निर्णय घेतील, असे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. राज्य सरकारकडून येत्या दोन दिवसांत नेमके कोणते आदेश येतील, त्याकडे सध्या आमचे लक्ष लागले आहे, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्या भागात कोरोनाचे 'हॉट स्पॉट' नाहीत, तेथे काही प्रमाणात शिथिलता देता येईल. तसेच जिल्ह्यातील काही भागांत उद्योगांना विशिष्ट अटींवर परवानगी दिली जाईल. आयटी क्षेत्रात 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे, तर अत्यावश्यकसह सर्व प्रकारची माल वाहतूक सुरू करता येईल, असे केंद्र सरकारने सुचविले आहे.

मात्र, याबाबत राज्य सरकार अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. माल वाहतुकीत अत्यावश्यक सेवांनाच प्राधान्य दिले जाईल, उर्वरित वाहतुकीबाबत गरजेनुसार निर्णय घेऊ, असे पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT