Couple_Divorce 
पुणे

... म्हणून पत्नीने नाकारली पोटगी; समाजापुढे निर्माण केला आदर्श!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मी कमावती आहे किंवा पतीकडे सध्या उत्पन्नाचा स्रोत नाही तर मी काय करू? मला पोटगी मिळालीच पाहिजे, अशी भूमिका ऐरवी पत्नी घेत असल्याचे कौटुंबिक न्यायालयात नेहमीच पाहायला मिळते. मात्र सुजाता यांनी आपला न्यायिक हक्क सोडून देत चक्क पोटगी नाकारली आहे. कारण पती हर्षद यांना नोकरीवरून काढण्यात आलं आहे. आर्थिक गोत्यात असलेल्या पतीच्या अडचणीत वाढ नको, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.

सुजाता यांनी पोटगीबाबत दाखविलेल्या समजुतदारपणामुळे त्यांचा घटस्फोटाचा मार्ग त्वरित मोकळा झाला. 20 फेब्रुवारी रोजी दोघांनी परस्पर संमतीने दाखल घटस्फोटासाठी केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालय सुरू होताच चौथ्या दिवशी मंजुर झाला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश गणात्रा यांनी हा आदेश दिला. दोघांनी ऍड.आकाश मुसळे, ऍड. अमृता साळुंखे, ऍड. अश्‍विनी साळवे आणि ऍड. आनंद धोत्रे यांच्यामार्फत हा अर्ज केला होता.

महाविद्यालयात असताना दोघांचे प्रेम जमले. 2017 साली ते विवाह बंधनात अडकले. त्यावेळी हर्षद हे एका मोठ्या खासगी कंपनीत चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. परंतु, काही कारणाने त्यांची नोकरी गेली. तेव्हापासून ते नोकरीच्या शोधात होते. याकाळात सुनीता या मात्र चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होत्या. दरम्यान वैचारिक मतभेद असल्याने दोघांचे पटेनासे झाले. त्यांना अपत्य नव्हते. दोघेही एक वर्षांपासून विभक्तपणे राहत होते. पती नोकरीस नसल्याने त्याची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. तर, सुजाता यांना चांगला पगार होता.

पतीकडून पोटगी मिळण्याचा अट्टाहास धरला तर त्यांच्या आर्थिक संकटात भर पडेल हे सुजाता यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत पती नोकरीस नसल्याने पोटगी न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्ज दाखल केल्यानंतर करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आठ जूनपासून कौटुंबिक न्यायालय सुरू झाले. त्यांनतर चार दिवसांतच हे प्रकरण निकाली काढण्यात आले.

नोकरी असो अथवा नसो घटस्फोटानंतरही पत्नीला सांभाळण्याची जबाबदारी पतीची आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या प्रकरणात पोटगीवरून वाद होत असतात. मात्र, या प्रकरणात पत्नीने उदरनिर्वाहाकरिता पतीकडून पोटगी मोठी रक्कम घेण्याच्या पद्धतीला नकार दिला. पतीची आर्थिक परिस्थिती समजावून घेत त्यांनी समाजापुढे एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. 
- ऍड. आकाश मुसळे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT