पुणे

पुणे : एटीएम कार्ड बदलून ज्येष्ठाच्या खात्यातून 32 हजार काढले

सकाळवृत्तसेवा

पुणे : एटीएममधून पैसे काढण्यासाठी अनोळखी माणसाची मदत घेणे ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. भामट्याने ज्येष्ठाला मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदली केले व त्याद्वारे 32 हजार रुपये काढले. मगरपट्टा परिसरातील एका बॅंकेत हा प्रकार घडला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कोलवडी येथील 65 वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात सप्टेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मगरपट्टा येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये पेन्शनचे अकाउंट आहे. सात सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास ते पेन्शनचे पैसे काढण्यासाठी तेथे गेले होते. तक्रारदार यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना पैसे निघाले नाही.

त्यावेळी तेथे असलेल्या व्यक्तीने त्यांना पैसे काढून देण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडून एटीएमकार्ड घेऊन हातचलाखीने दुसरेच कार्ड एटीएममध्ये टाकले. त्यानंतर तक्रारदार यांना पीन क्रमांक टाकायला सांगितला. तक्रारदार हे पीन क्रमांक टाकत असताना तो त्याने पाहिला. पण दुसरेच कार्ड एटीएमध्ये टाकल्याने पैसे निघाले नाहीत.

त्यामुळे तक्रारदार यांना आरोपीने बदली केलेले कार्ड परत दिले. तक्रारदार हे दुसरेच एटीएम कार्ड घेऊन तेथून निघून आले. त्यानंतर आरोपीने ज्येष्ठाच्या एटीएम कार्डचा वापर करून 32 हजार रुपये काढले. तक्रारदार यांना त्यांच्या खात्यातून पैसे कमी झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपीचा सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला जात आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT