sakal
पुणे

राज्य वखार महामंडळास सुमारे १११ कोटींचा नफा

कोरोनाकाळात धान्य साठवणूक क्षमतेत वाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य वखार महामंडळास २०२०-२१ या वर्षात ११० कोटी ७३ लाख रुपयांचा नफा झाला आहे. लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात गोदामे भाडेतत्वावर घेऊन धान्य साठवणूक क्षमतेत वाढ केली. यामुळे धान्य साठवणूक क्षमता २३ लाख टनांपर्यंत गेली आहे.

राज्य वखार महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. त्यानंतर वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तावरे म्हणाले, ‘‘वखार महामंडळास २०२० ते २१ या वर्षात ४२२ कोटी ४८ कोटींचे उत्पन्न मिळाले. तर २०१९ ते २० या काळातील उत्पन्न ३४० कोटी ६२ कोटी रुपये होते.

त्यामुळे महामंडळास कोरोनाच्या काळातही ११० कोटी ७३ लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला. २०१९ ते २० या काळात हा नफा ६६ कोटी ३६ लाख एवढा होता. कोरोनाकाळात लॉकडाउन असताना सरकारकडून तूर, कापूस, हरभरा, उडीद या डाळींची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होती. वखार महामंडळाच्या गोदामाची क्षमता १८ लाख टन एवढी होती. गोदामे कमी पडत असल्याने बाहेरील ३७० गोदामे भाडेतत्त्वावर घेऊन साठवणुकीची क्षमता २३ लाख टनापर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे नफा झाला.’’

कृषी गोदामे व लॉजिस्टिक पार्क उभारणार

महामंडळाने कृषी गोदामे व लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील जांबरगाव येथे सुमारे २५ एकर जमीन, तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे जवळील आंबी येथे २५ एकर जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी आधुनिक पद्धतीची गोदामे उभारण्यात येणार आहेत. गोदामांच्या जागेत मार्चअखेर ७९४.३२ एकरवरून ८२५.५० एकरपर्यंत वाढ झाली आहे. या वर्षात २४ हजार टनांपर्यंत अतिरिक्त साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी महामंडळाने एकूण सहा ठिकाणी १२ गोदामांचे बांधकाम सुरू केल्याची माहिती दीपक तावरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic News : प्रवासाला निघालात? थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण ट्राफिक, सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील स्थिती काय?

Mumbai News: कबुतरांना दाणे खायला घालणे पडले महागात, मुंबईतील व्यावसायिकावर कोर्टाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Akola Municipal Election : भाजपच्या जागावाटपावर राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता? अमोल मिटकरींचं भाजपला थेट आव्हान...

Maharashtra Cold : राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT