A woman commits suicide by saying bye bye to her mom in Pune
A woman commits suicide by saying bye bye to her mom in Pune 
पुणे

पुणे : आईला मोबाईलवरून 'बाय बाय' म्हणत विवाहितेने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

शिरूर : मानलेल्या आईला मोबाईलवरून "बाय बाय' म्हणत विवाहित तरूणीने मृत्युला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना येथे घडली. प्राची गणेश ओहोळ (वय 21, रा. बागवान नगर, शिरूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव असून, त्या येथील एका खासगी रूग्णालयात परिचारिका म्हणून काम पाहात होत्या.

मृत प्राची यांचे पती गणेश लालासाहेब ओहोळ यांनी याबाबतची खबर पोलिसांना दिली. शुक्रवारी (ता. 20) रात्री घडलेल्या या प्रकाराची सुरवातीला "अकस्मात मृत्यु' म्हणून नोंद करण्यात आली होती. संबंधितांचे जबाब नोंदविल्यानंतर शिरूर पोलिसांनी आज आत्महत्येची नोंद केली. तथापि, या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

केजीएफचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर; संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्राची ओहोळ या येथील डॉ. मनिषा चोरे यांच्या दवाखान्यात गेल्या तीन वर्षांपासून परिचारिका म्हणून काम पाहात होत्या व त्यांनी डॉ. चोरे यांना आई मानले होते. डॉ. चोरे यांच्या वाहनावर चालक म्हणून काम पाहणाऱ्या गणेश ओहोळ यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्या विमनस्क स्थितीत होत्या व डॉ. चोरे यांच्याशी बोलताना सातत्याने आत्महत्येचा विचार डोक्‍यात घोळत असल्याचे बोलत होत्या. प्रत्येक वेळी डॉ. चोरे यांनी त्यांना समजावून सांगत आत्महत्येपासून परावृत्त केले होते व समजूत काढली होती.

आठवणी २०११ वर्ल्डकपच्या; सचिनसाठी संघाने गायलं होतं गाणं !

दरम्यान, शुक्रवारी (ता. 20) त्या कामावर न आल्याने डॉ. चोरे यांनी त्यांना संपर्क साधून दवाखान्यात बोलावले. दवाखान्यात काही वेळ थांबून सर्वांशी हसून, बोलून "आता निरोप घेते' असे म्हणून त्या निघून गेल्या. डॉ चोरे यांनी त्यांची बरीच समजूत काढली व थांबायला लावले, परंतु काही वेळाने त्या घरी निघून गेल्या. दरम्यान, सायंकाळी पाच च्या सुमारास त्यांनी डॉ. चोरे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून "मी चालले, बाय बाय' असे म्हणत फोन कट केला. डॉ. चोरे यांना संशय आल्याने त्या गणेश ओहोळ यांना घेऊन तातडीने प्राची राहात असलेल्या बागवान नगर मधील घरी आल्या, तेव्हा प्राची यांनी बेडशीटने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघांनी तातडीने त्यांना खाली घेऊन खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असताना रात्री नऊच्या सुमारास त्यांचा वाटेतच मृत्यु झाला.

विमनस्क अवस्थेमुळे प्राची ओहोळ यांनी गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास पोलिस नाईक उमेश भगत करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT