नळस्टॉप - पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या भालेकर चाळीतील महिला.
नळस्टॉप - पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या भालेकर चाळीतील महिला. 
पुणे

महिलांची पाण्यासाठी वणवण

सकाळवृत्तसेवा

पौड रस्ता - नळस्टॉपजवळील भालेकर चाळीतील महिला गेली तीन महिने पाणीटंचाईला तोंड देत आहेत. कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवाशांनी नळ खाली घेतले, तसेच अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने नळाला मोटारी लावल्या, तरीसुद्धा पुरेसे पाणी मिळत नसल्याने वैतागलेल्या नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्मला भरम म्हणाल्या की, नगरसेवकाला तक्रार केल्यानंतर त्यांनी टॅंकर पाठवला. पण रात्री दहानंतर टॅंकर येत असेल तर आम्ही महिलांनी करायचे काय? येथे रस्त्याचे काम बरेच दिवस चालू आहे. त्यामुळे टॅंकरचे पाणी आणायला त्रास होतो. वर्षभरापासून मी दुसऱ्यांच्या नळावर पाणी भरत असल्याचे निधी बोनापूर्ती यांनी सांगितले. तसेच इतर महिलांनी सांगितले की, नगरसेविकेकडे तक्रार केली तर त्या म्हणाल्या की, मी झोपडपट्टीसाठी काम करणार नाही. जर आमचे काम होत नसेल तर आम्ही मतदान का करायचे?

मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आम्ही आहोत. गौरी दिघे, कमल जाधव, जनाबाई अनिवसे, प्रियांका जोरी, सुनीता खिलारे, आशा यादव, जनाबाई बानगुडे, नाना हेमगुढे, चैत्राली पवळे, कमल सावंत, सायली ओवले, प्रियांका पवार यांनी सांगितले की, पाणी नसल्यामुळे आमच्या चाळीत आजाराचे प्रमाण वाढले आहे. नगरसेवकांना सांगूनही प्रश्‍न सुटलेला नाही.

चार दिवसांपासून या भागात पाणीपुरवठ्यासाठी कशामुळे अडचणी येत आहेत याचा शोध घेत आहोत. लवकरच यावर मार्ग निघेल अशी आशा आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चार वाहिन्या आहेत. कुठे अडथळा आला आहे, याचा शोध सुरू आहे.
- संतोष लांजेकर, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी

एक वर्षापासून आम्ही पाणीटंचाईचा सामना करत आहोत. टॅंकरने सर्वांना पाणी घेता येत नाही. सगळ्या महिला धुण्याभांड्याच्या कामाला जातात. कामाला जाणाऱ्यांच्या सोयीने टॅंकर येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना लांबून पाणी आणावे लागते.
- कमल सावंत, रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT