Corona_Wardboy 
पुणे

कोरोनाचे उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : क्वॉरंटाईन सेंटरमध्ये महिलांबाबत होणारे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण आता याच स्वरुपाचे प्रकार खासगी रुग्णालयातही घडू लागले आहेत. हडपसरमधील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेवर तेथील वॉर्डबॉयने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली.

अशोक नामदेव गवळी (वय ४०, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गवळीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोरोनाबाधित असून त्यांच्यावर हडपसरमधील एका नामांकित रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता एक पीपीई किट घातलेली व्यक्ती फिर्यादीच्या बेडजवळ आला. त्याने त्याच्या चेहऱ्यावरील मास्क खाली घेऊन आपल्याला ओळखले का? असा प्रश्न फिर्यादीस विचारला. त्यावेळी फिर्यादीने ओळखले नाही असे सांगितले. तेव्हा त्याने फिर्यादीच्या जवळ येऊन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

या प्रकारामुळे फिर्यादीने घाबरून त्यास बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे आलेल्या एका मुलीने 'अशोक, तू येथे काय करतोस' अशी विचारणा केली. तेव्हा, आरोपी तेथून निघून गेला. फिर्यादीने घडलेला प्रकार त्यांचे कुटुंबीय आणि डॉक्टरांना सांगितला. संबंधीत व्यक्ती हा रुग्णालयात काम करणारा वॉर्डबॉय असल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर त्यास तत्काळ अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर.एस.ढावरे करीत आहेत.

पोलिसांनी पीपीई किट घालून घेतली महिलेची फिर्याद
हडपसर पोलिसांना रात्री या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयात जाऊन पीपीई किट घालून महिलेची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT