Dating App sakal
पुणे

डेटींग ऍपवर ओळख; महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक

डेटींग ऍपवरून ओळख झालेल्या व्यक्तीने उच्चशिक्षीत महिलेस डॉक्‍टर असल्याची बतावणी करून, परदेशी चलन सीमाशुल्क विभागाकडून सोडविण्याचे कारण सांगत महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक केली.

सकाळ वृत्तसेवा

डेटींग ऍपवरून ओळख झालेल्या व्यक्तीने उच्चशिक्षीत महिलेस डॉक्‍टर असल्याची बतावणी करून, परदेशी चलन सीमाशुल्क विभागाकडून सोडविण्याचे कारण सांगत महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक केली.

पुणे - डेटींग ऍपवरून (Dating App) ओळख (Identity) झालेल्या व्यक्तीने उच्चशिक्षीत महिलेस (Women) डॉक्‍टर असल्याची बतावणी करून, परदेशी चलन सीमाशुल्क विभागाकडून सोडविण्याचे कारण सांगत महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा (Crime दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वडगाव शेरी येथील 42 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अजय नाथन व इतर पाच जणांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना जुन ते ऑगस्ट 2021 दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या उच्चशिक्षीत आहेत. या महिलेची डेटींग ऍपवरून अजय नाथन नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यावेळी नाथन याने फिर्यादीस तो जर्मनीमध्ये स्थायिक असून डॉक्‍टर असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये समाजमाध्यमाद्वारे चॅटींग सुरू झाले. त्यानंतर त्याने महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तो लग्न करण्यासाठी दोन लाख अमेरीकन डॉलर घेऊन दिल्ली येथे आला असल्याचे त्याने महिलेस सांगितले.

परंतु, परदेशी चलन असल्याने त्यास सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडविले असून चेक क्‍लेअर करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे त्याने महिलेस सांगितले. त्यानुसार, महिलेने त्यास काही पैसे पाठविले. त्यानंतर त्याने विविध प्रकारची कारणे सांगून महिलेकडून सात लाख आठ हजार रुपये घेतले. महिलेस आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर त्यांनी प्रारंभी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अशी घ्या काळजी

- अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करु नका

- फेसबुकवर अनोळखी व्यक्तींच्या "फ्रेंड रिक्वेस्ट' स्विकारू नका

- समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री वाढविताना पुरेशी काळजी घ्या

- परिचीत नसलेल्यांशी व्हॉटसअप कॉलींगद्वारे संवाद साधू नका

- सोशल मीडियावर वैयक्तीक व गोपनीय माहिती ठेवण्याचे टाळा

- वैयक्तीक, कुटुंबांचे व्हिडीओ, छायाचित्रे सोशल मीडियावर ठेवू नका

- चुकीचे घडत असल्यास कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रीणी किंवा पोलिसांशी संवाद साधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT